Saturday, February 24, 2024
घरमानिनीRelationshipपालकांनी स्वतः मध्येही बदल करावा

पालकांनी स्वतः मध्येही बदल करावा

Subscribe

मुलांचे संगोपन करणे वाटते तितके सोप्पे नसते. मुलांचे संगोपन करताना पालकांना अनेक गोष्टींचा त्याग करावा लागतो. पालक हे मुलांना आदर्शासारखे असतात. पालकांच्या अनेक वाईट चांगल्या सवयी मुले न शिकवता आत्मसात करतात. त्यामुळे पालकांनी मुलांचे संगोपन करताना काही गोष्टी स्वतःमध्ये बदलणे गरजेचे असते कारण तुमच्या चुकीच्या सवयीही मुले आत्मसात करू शकतात.

मुलांचे रोल मॉडेल व्हा –
जर तुम्ही तुमच्या मुलांसाठी चांगले रोल मॉडेल नसाल तर मुले तुमचं मूल्यमापन करणे बंद करतील. यासाठी तुम्ही घरापासून सुरुवात करू शकता. यात तुम्ही स्वयंपाकघरात जाऊन स्वयंपाक करणे, साफसफाई करणे, घरातील कामे करणे इत्यादी कामे करून घरातील सदस्यांना शक्य तितकी मदत करण्याचा प्रयत्न करू शकता. तुमच्या या सवयी मुले न सांगताच आत्मसात करतील.

- Advertisement -

चुका स्वीकारा –
शिस्त केवळ मुलांसाठीच नाही तर पालकांसाठीही महत्वाची आहे. कारण तुमच्याकडून एखादी चूक झाल्यास ती तुम्ही दुर्लक्ष करू नका. माफी मागा किंवा ती स्वीकारा. तुमच्या अशा वागण्याने मुलं शिस्त लागेल. याशिवाय जे पालक मुलांसमोर आपल्या चुका मान्य करतात मुले त्यांना जास्त महत्व देतात.

- Advertisement -

रागावर ताबा मिळवा –
जर तुमचे तुमच्या भावनांवर नियंत्रण नसेल आणि तुम्ही रागावून मुलांना शिव्या द्यायला सुरुवात केलीत तर याने मुलांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. तसेच अशावेळी तुमचे वर्तन पाहून तेही अपशब्द वापरण्याची शक्यता निर्माण होते. मुलांचा आत्मविश्वासही कमी होतो. त्यामुळे पालकांनी असे करणे टाळले पाहिजे.

अंतर मिटवा –
काही घरात मुलांवर धाक राहण्यासाठी वडील प्रेम दाखवत नाही. ज्यामुळे नात्यात अंतर निर्माण होते. त्यामुळे पालकांनी असे करू नये. पालकांनी मुलांचे लाड करायला हवेत. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, लहानपणीच्या आठवणीत जर तुम्ही प्रेमळ बाबा राहिलात तरच म्हातारपणापर्यंत तुमच्यात आपुलकी राहू शकते. त्यामुळे पालकांनी मुलांचे मित्र बनणे गरजेचे आहे.

 

 


हेही वाचा ; जनरेशन गॅपची समस्या कशी सोडवाल?

- Advertisment -

Manini