घरमहाराष्ट्रपुणेPUNE : मनपात सॅनिटरी नॅपकिन घोटाळा, 38 हजार विद्यार्थिनी 2 वर्षांपासून वंचित;...

PUNE : मनपात सॅनिटरी नॅपकिन घोटाळा, 38 हजार विद्यार्थिनी 2 वर्षांपासून वंचित; वाचा, कोण आहे सूत्रधार?

Subscribe

पुण्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुणे महापालिका हद्दीतील 38 हजार विद्यार्थीनींना गेली दोन वर्षे सॅनिटरी नॅपकिन मिळालेच नाहीत

पुणे: शाळेतील विद्यार्थीनींना मोफत स‌‌ॅनिटरी नॅपकिन मिळावे, याकरता मोफत सॅनिटरी न‌‍‌पकिन वाटण्याची योजना सरकारने राबवली होती. त्या योजनेनुसार, विद्यार्थीनींना मोफत सॅनिटरी नॅपकिन दिले जात होते. मात्र, आता पुण्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुणे महापालिका हद्दीतील 38 हजार विद्यार्थीनींना गेली दोन वर्षे सॅनिटरी नॅपकिन मिळालेच नाहीत,असा आरोप काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी केला आहे. त्यासंदर्भात त्यांनी पत्र देखील मुख्यमंत्र्यांना लिहिलं आहे. (PUNE Municipal sanitary napkin scam 38 thousand girl students deprived for 2 years Read Who is Facilitator)

अरविंद शिंदे म्हणाले की, मागच्या दोन वर्षांत 38 हजार विद्यार्थीनींना सॅनिटरी नॅपकिन मिळालेले नाहीत. भाजपा खासदार-आमदार यांच्या टेंडरमध्येच सॅनिटरी नॅपकिन अडकले आहेत. भाजपाचे खासदार, आमदार यांच्या टक्केवारीवरून वाद सुरू आहेत. टेंडर देण्यावरून महापालिकेत आमदार- खासदारांमध्येच भांडण सुरू आहे. टेंडर देण्यासाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर भाजप नेत्यांचा दबाव असल्याचा काँग्रेसने आरोप केला आहे. मात्र यामुळे विद्यार्थिनींना, मुलींना मोठा मनस्ताप भोगावा लागत आहे.

- Advertisement -

शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे आणि पुण्यातील क‌ॅन्टोमेंटचे भाजप आमदार सुनील कांबळे यांचा टेंडरवरून वाद सुरू आहे. पैसे खाण्यावरून त्यांच्यात भांडण सुरू असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. महापालिका आयुक्त कोणाच्या दबावाखाली काम करत आहे? जर दबावाखाली काम करत असतील तर त्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही, असंही काँग्रेसकडून सांगण्यात आलं आहे.

भाजपाच्या वादाचा फटका विद्यार्थीनींना का?

याप्रकरणाची दखल घेण्यात यावी, तसंच कारवाई करण्यात यावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. भाजपा नेते खालच्या स्तरावर जाऊन वागत आहेत. मात्र त्यांच्या वादाचा फटका पुणे महापालिका हद्दीतील मुलींना बसला आहे. याप्रकरणी काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहित कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसंच, योग्य ती कारवाई झाली नाही तर महापालिकेत जाऊन काँग्रेस तीव्र आंदोलन करेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

- Advertisement -

काय आहे योजना? 

अस्मिता योजनेअंतर्गत राज्याच्या ग्रामीण भागातील 11 ते 19 वर्षांमधील मुलींना अस्मिता योजनेचा लाभ मिळतो. त्यांना या योजनेद्वारे फक्त 1 रुपयात 8 सॅनिटरी पॅड मिळतात. अस्मिता योजनेद्वारे बचत गटातील महिलांनादेखील सॅनिटरी पॅड अत्यल्प दरामध्ये उपलब्ध केले जातात.

(हेही वाचा: Pune Mahapalika : केंद्र सरकारचे 144 कोटी तिजोरीत पडून, खर्च करायचे कसे? पालिकेला पडला प्रश्न)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -