Tuesday, April 30, 2024
घरमानिनीRelationshipजनरेशन गॅपची समस्या कशी सोडवाल?

जनरेशन गॅपची समस्या कशी सोडवाल?

Subscribe

आजकाल जवळजवळ सर्वच घरात जनरेशन गॅपची समस्या दिसून येत आहे. विशेष करून वडील आणि मुलाच्या नातेसंबंधात अनेक अडचणी जाणवू लागल्यात. त्यामुळे ही समस्या वेळीच सोडवणे गरजेचे आहे अन्यथा वडील आणि मुलाच्या नात्यात दुरावा निर्माण यायला वेळ लागणार नाही. आज आपण जनरेशन गॅपची समस्या सोडविण्यासाठी कोणत्या गोष्टी करणे गरजेचे आहे ते पाहणार आहोत.

संवाद महत्वाचा –
कोणतेही नाते प्रफुल्लित राहण्यासाठी नात्यात संवाद असणे गरजेचे असते. पण, अनेक घरात असे दिसून येते की वडील आणि मुलाच्या नात्यातील संवाद हा कमी झाला आहे किंबहुना संवादच संपला आहे. जर जनरेशन गॅपमुळे तुमच्या नात्यात फरक पडला असेल तर वडिलांनी मुलाशी किंवा मुलाने वडिलांशी बोलणे गरजेचे आहे.

- Advertisement -

नात्यात वेळ देणे महत्वाचे –
नात्यात वेळ देणं खूप गरजेचे आहे. आपण कितीही बिझी असलो तरी दोघांनी एकमेकांना वेळ देणं गरजेचे आहे. यासाठी तुम्ही घरी एकत्र बसू शकता, दिवसातील थोडं वेळ काढून बाहेर जाऊन शकता अगदीच वेळ नसेल तर महिन्यातून एखादया पिकनिकचा प्लॅन करू शकता. असे केल्याने तुमच्यात निर्माण झालेला जनरेशन गॅप दूर होऊ शकतो.

- Advertisement -

एकमेकांना समजून घ्या –
नात्यात एकमेकांना समजून घेणे अत्यंत महत्वाचे आहे. जनरेशन गॅप भरून काढण्यासाठी वडिलांनी मुलाला समजून घेणे आणि मुलाने वडिलांना समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे.

प्रेम करणे आणि दाखवून देणे महत्वाचे –
वडील आणि मुलाच्या नात्यात प्रेम असतंच पण, कित्येकदा ते दाखवलं जात नाही आणि नात्यात जनरेशन गॅप निर्माण होतो. अनेक मुलांची तक्रार असते की बाबा प्रेम करत नाही. असे होऊ नये वाटत असेल तर वडिलांनी मुलांशी बोलणे अत्यंत गरजेचे आहे.

 

 

 


हेही वाचा ;  कोणत्या वयापर्यंत पालकांनी मुलांसोबत झोपावे?

- Advertisment -

Manini