घरदेश-विदेशChandigarh Mayor Election : महापौर पदाची निवडणूक रद्द करा, निवडणुकीचा वाद पोहोचला...

Chandigarh Mayor Election : महापौर पदाची निवडणूक रद्द करा, निवडणुकीचा वाद पोहोचला उच्च न्यायालयात

Subscribe

चंदीगड – बहुमत नसतानाही चंदीगडच्या महापौर निवडणुकीत भाजपने बाजी मारली आहे. मात्र, भाजपच्या या विजयाने विरोधकांनी महापौर निवडणुकीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. भाजपने गडबड करून निवडणूक जिंकल्याचा आरोप काँग्रेस आणि आम आदमी पक्ष या दोन्ही पक्षांनी केला आहे. याविरोधात इंडिया आघाडीने पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. महापौर निवडणूक बेकायदेशीर घोषित करण्याची तसेच पीठासीन अधिकाऱ्यावर मतपत्रिका चोरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

हेही वाचा – Mobile Phone : मोबाइल होणार स्वस्त, आयात शुल्कात पाच टक्क्यांची घट

- Advertisement -

चंदीगड महापालिकेत एकूण 35 नगरसेवक आणि एक खासदार आहेत. विजयासाठी 19 मते मिळवणे आवश्यक होते. भाजपचे स्वतःचे नगरसेवक आणि खासदारासह संख्याबळ होत होते 15. चंदीगड महापौर निवडणुकीत स्थानिक खासदारांनाही मतदानाचा अधिकार आहे. भाजपच्या किरण खेर या चंदीगडमधून खासदार आहेत, त्यामुळे त्यांचेही मत ग्राह्य धरले गेले. मात्र, विजयासाठी अजूनही चार मते कमी होती. शिरोमणी अकाली दलाच्या एकमेव नगरसेवकाचे मत स्वत:कडे घेतले तरी भाजपची मते होत होती. तर दुसरीकडे, आम आदमीचे 13 आणि काँग्रेसचे 7 अशी 20 मते आधीच आपकडे होती. या दोन्ही पक्षांनी हातमिळवणी केल्यास महापौर निवडणुकीत त्यांचा विजय निश्चित मानला जात होता. असे असतानाही आणि भाजपाकडे पुरेसे संख्याबळ नसतानाही भाजपाचा विजय झाल्याने आप आणि कॉंग्रेस बिथरले आहेत.

नेमके काय घडले?

काँग्रेस आणि आपला देण्यात आलेल्या २० मतांपैकी ८ मते फेटाळण्यात आली. यामुळे आप आणि कॉंग्रेस या दोघांच्या उमेदवाराला केवळ 12 मते मिळाली. भाजप उमेदवार मनोज सोनकर यांना १६ मते तर काँग्रेस आणि आम आदमी पक्षाच्या उमेदवारांना १२ मते मिळाली. त्यामुळेच मतमोजणीनंतर भाजपचा उमेदवार विजयी झाल्याचे घोषित करण्यात आले.

- Advertisement -

हेही वाचा – MVA seat sharing : मविआत अजूनही 8 जागांवर धुसफूस कायम, पण…

विरोधकांचे आक्षेप

काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले, ‘महापौर निवडणुकीतही छक्केपंजे करून यांनी सत्ता आणली. संपूर्ण जगासमोर लोकशाहीचा घात करणारी भाजप दिल्लीत सत्तेत राहण्यासाठी काय करेल, हे कल्पनेच्या पलीकडचे आहे. वर्षांपूर्वी याच दिवशी गोडसेने गांधीजींची हत्या केली होती आणि आज गोडसेवाद्यांनी त्यांच्या आदर्शांचा आणि संविधानिक मूल्यांचा बळी दिला.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली आहे. महापौरपदाच्या निवडणुकीत हे लोक एवढ्या खालच्या पातळीवर जाऊ शकतात, तर देशातील निवडणुकीत ते कोणत्याही थराला जाऊ शकतात, असे ते म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -