Tuesday, May 30, 2023
घर मानिनी Religious पत्नीने पतीच्या डाव्या बाजूलाच का झोपावे?

पत्नीने पतीच्या डाव्या बाजूलाच का झोपावे?

Subscribe

वास्तु शास्रात पती-पत्नीने नक्की कोणत्या दिशेला झोपावे हे सांगितले गेले आहे. धार्मिक दृष्टीकोनातून ही या बद्दलचे काही नियम तयार करण्यात आले आहेत. त्यापैकीच एक म्हणजे पत्नीने पतीच्या डाव्या बाजूला झोपणे. पण याउलट पती-पत्नीने का झोपू नये याच बद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

-पौराणिक कथेनुसार भगवान शंकराने जेव्हा अर्धनारेश्वर रुप घेतले होते तेव्हा शरिराच्या डाव्या बाजूतून स्री तत्व म्हणजेच माता पार्वती प्रकट झाली होती.
-यामुळेच हिंदू धर्मातील पत्नीला वामांगी असे म्हटले जाते. वामांगीचा अर्थ आहे की, शरिराच्या डाव्या बाजूची अधिकारी. पुरुषांची डावी बाजू स्री चा हिस्सा असल्याचे मानले जाते.
-हेच कारण आहे की, कोणतेही शुभ काम करताना पत्नीने पतीच्या डाव्या बाजूला बसावे. यामध्ये पत्नीने नवऱ्याच्या डाव्या बाजूला झोपावे.
-अशी मान्यता आङे की, पत्नीने पतीच्या डाव्या बाजूला झोपणे फार शुभ मानले जाते. यामुळे वैवाहिक आयुष्यात सुख, समृद्धी लाभते.
-असे केल्याने पतीसाठी सौभाग्यमय मानले जाते. यामुळे पतीचे रक्षण सुद्धा होते.
-अशी मान्यता आहे की, यमराज जेव्हा सत्यवानाचे प्राण घेऊन जाण्यास आला होता तेव्हा ते सुद्धा डाव्या बाजूने आले होते. सावित्रीने आपल्या पतीच्या संरक्षण करत त्याचा जीव वाचवला होता.
-अशातच पत्नीने पतीच्या डाव्या बाजूला झोपल्यास यमराजांपासून त्याचे संरक्षण होते.
-शास्रात सांगितले गेले आहे की, कन्यादान, विवाह, यज्ञकर्म, जातकर्म, नामकरण आणि अन्न प्राशनावेळी पत्नीने पतीच्या डाव्या बाजूलाच बसावे.


- Advertisement -

हेही वाचा- उपवास करण्याचे वैज्ञानिक आणि धार्मिक फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -

Manini