घरमहाराष्ट्रसंजय राऊतांवर Ashish Shelar यांची खरमरती टीका, म्हणाले - "नावापुढे "डॉ" लागण्यासाठी..."

संजय राऊतांवर Ashish Shelar यांची खरमरती टीका, म्हणाले – “नावापुढे “डॉ” लागण्यासाठी…”

Subscribe

संजय राऊत यांनी आजच्या (ता. 27 डिसेंबर) सामना वृत्तपत्रातून उपमुख्यमंत्री, डॉ. देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांच्या या टीकेला भाजपाकडून आणि त्यांच्या नेतेमंडळींकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी राऊतांच्या टीकेला खरमरीत प्रत्युत्तर दिले आहे.

मुंबई : विद्यमान सरकारच्या काळात महाराष्ट्रात तीन हजारांवर शेतकऱयांच्या नावापुढे ‘कै.’, ‘स्व.’ अशा उपाध्या लागल्या. त्यांची घरेदारे उजाड झाली. कुटुंबे अनाथ व पोरकी झाली. त्यावर सरकारमधील डॉ. काही बोलत नाही, असे लिहित संजय राऊत यांनी आजच्या (ता. 27 डिसेंबर) सामना वृत्तपत्रातून उपमुख्यमंत्री, डॉ. देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना जपानच्या कोयासान विद्यापीठाकडून काल मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली. याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाही मानद डॉक्टरेटने सन्मानित करण्यात आले आहे. याच मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. राज्यात संपूर्ण मंत्रिमंडळ डॉक्टरांचे तयार करा असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे. त्यांच्या या टीकेला भाजपाकडून आणि त्यांच्या नेतेमंडळींकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी राऊतांच्या टीकेला खरमरीत प्रत्युत्तर दिले आहे. (Ashish Shelar’s Reply to Sanjay Raut’s Criticism on Honorary Doctorate)

हेही वाचा… Ram Mandir लोकार्पणापूर्वी लोकशाही कमकुवत? बेरोजगारी-महागाई महत्त्वाचे मुद्दे – सॅम पित्रोदा

- Advertisement -

भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी संजय राऊत आणि सामनातील अग्रलेखावर X (आधीचे ट्विटर) या सोशल मीडिया साईटवर पोस्ट लिहिली आहे. मराठी माणसाच्या घरांचे कटकमिशन खाऊन डॉक्टरेट मिळत नाही. असेही शेलारांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे. त्यामुळे आता हा वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे. ट्वीटच्या माध्यमातून टीका करत आशिष शेलार यांनी लिहिले आहे की, “रोज सकाळी टिव्हीवर फालतू बडबड करुन अथवा मराठी माणसाच्या घरांचे कटकमिशन खाऊन डॉक्टरेट मिळत नाही. नतद्रष्टासारखे “हग्रलेख” लिहून तर नाहीच नाही. नावापुढे “डॉ” लागण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री डॉ. देवेंद्र फडणवीस यांच्यासारखी गरीबांची सेवा, प्रचंड मेहनत, कष्ट, धाडस, धडाडी, निष्ठा, त्याग आणि संघर्ष करावा लागतो…! “डॉक्टर” या साडेतीन अक्षरांची किंमत तुम्ही नाही समजू शकणार श्रीमान संजयबाबू!”

ही पोस्ट त्यांनी संजय राऊत, शिवसेना ठाकरे गट, उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, भाजपा मुंबई आणि भाजपा महाराष्ट्रला टॅग केली आहे. आशिष शेलार यांनी काही पहिल्यांदाच डॉक्टरेटच्या विषयावरून संजय राऊत यांच्यावर टीका केलेली नाही. याआधी देखील त्यांनी प्रसार माध्यमांसमोर म्हटले होते की, संजय राऊत यांना कम्पाउंडरची पदवी द्या. त्यामुळे आता मानद डॉक्टरेटवरून सुरू झालेला हा वाद थांबताना दिसून येत नाहीये. पण आता शेलारांनी केलेल्या टीकेला, त्यांनी सामनातील अग्रलेखासाठी वापरलेल्या शब्दाला संजय राऊत नेमके काय प्रत्युत्तर देतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

- Advertisement -

काय लिहिले आहे सामनातील अग्रलेखात?

महाराष्ट्रात शेतकरी, बेरोजगार रोज आत्महत्या करीत आहेत व बहुदा या महान कामगिरीबद्दलच उपमुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस यांना ‘डॉक्टरेट’ उपाधी देऊन सन्मानित करण्यात येत आहे. जपानमधील एका विद्यापीठाने सामाजिक समानतेसाठी केलेल्या कार्याबद्दल त्यांना ही ‘डॉक्टरेट’ दिल्याचे समजते. राज्यात सामाजिक समतेचे व पुरोगामी विचाराचे वाभाडे निघाले आहेत. सध्या मराठा, ओबीसी व इतर समाजातील भांडणे विकोपाला जाऊन परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. त्यामागे कोणाचे डोके व खोके आहेत ते महाराष्ट्र जाणतो. आता देवेंद्र फडणवीस यांच्यामागे ‘डॉ.’ अशी उपाधी लागेल. मुख्यमंत्री मिंधे यांनाही मधल्या काळात कुणा संस्थेने सामाजिक कार्याबद्दल ‘डॉ.’ पदवी दिली. पण विद्यमान सरकारच्या काळात महाराष्ट्रात तीन हजारांवर शेतकऱयांच्या नावापुढे ‘कै.’, ‘स्व.’ अशा उपाध्या लागल्या. त्यांची घरेदारे उजाड झाली. कुटुंबे अनाथ व पोरकी झाली. त्यावर सरकारमधील डॉ. बोलत नाहीत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -