घरमहाराष्ट्रपुणेराज्यकर्त्यांमध्ये सौंदर्यदृष्टी असावी लागते, अन्यथा शहरं बकालच दिसणार; राज ठाकरेंचं टीकास्त्र

राज्यकर्त्यांमध्ये सौंदर्यदृष्टी असावी लागते, अन्यथा शहरं बकालच दिसणार; राज ठाकरेंचं टीकास्त्र

Subscribe

आजच्या राज्यकर्त्यांकडे सौंदर्यदृष्टीच नाहीये. त्यामुळे आपल्याकडे शहराचं व्यवस्थित प्लॅनिंग होत नाही. महापालिकांमध्ये आर्किटेक्चरपेक्षा इंजिनीअरला अधिक महत्त्व आहे, असं राज ठाकरेंनी सांगितलं.

पुणे: मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यानी आर्किटेक्ट, इंजीनिअर आणि राज्यकर्त्यांची सौंदर्यदृष्टी यावरून राज्यकर्त्यांवर जोरदार टीका केली. आजच्या राज्यकर्त्यांकडे सौंदर्यदृष्टीच नाहीये. त्यामुळे आपल्याकडे शहराचं व्यवस्थित प्लॅनिंग होत नाही. महापालिकांमध्ये आर्किटेक्चरपेक्षा इंजिनीअरला अधिक महत्त्व आहे, असं सांगतानाच माझ्या हातात सत्ता आली तर महाराष्ट्राची प्लॅनिंग करण्याची जबाबदारी मी आर्किटेक्चरपेक्षा इंजिनीअरला अधिक महत्त्व आहे, असं सांगतानाच माझ्या हातात सत्ता आली तर महाराष्ट्राची प्लॅनिंग करण्याची जबाबदारी मी आर्किटेक्चरकडे देईन, असं राज ठाकरे यांनी सांगितलं. (Rulers have to have an aesthetic sense otherwise the cities will look dull Criticism of Raj Thackeray on Government in Pune)

पुण्यातील एका कार्यक्रमात राज ठाकरे बोलत होते. यावेळी त्यांनी शहर बकाल होण्यामागे राज्यकर्त्यांकडे सौंदर्यदृष्टी नसल्याचं म्हटलं.

- Advertisement -

प्रत्येकानं आपापला परिसर स्वच्छ ठेवला तरी अनेक गोष्टींमध्ये समाधान मिळेल. माझा विचार फक्त एवढाच होतो की मला घरातून बाहेर पडल्यावर मी एका चांगल्या शहरात जगतोय, असा मला फीलाला पाहिजे. तर त्या जगण्याला अर्थ आहे. धक्के खात आहे, फुटपाथवर पाय मुरगळत आहेत, खड्ड्यातून गाड्या जात आहेत, याला जगणं म्हणायचं का? तुमचा जन्म झाला आहे म्हणून तुम्ही जगताय. देशातल्या अनेक तरुण-तरुणींना परदेशात सभोवतालच्या याच वातावरणासाठी परदेशता जायचंय, असा मुद्दाही राज ठाकरें यांनी यावेळी उपस्थित केला.

राज ठाकरे यांनी मुलाखतीच्या सुरुवातीलाच बीड सर्किट हाऊसचा किस्सा सांगितला. बीडमध्ये सर्किटहाऊसमध्ये गेलो होतो. तिथल्या बेडरुममध्ये गेलो. बेडरुमचा मोठा हॉल होता आणि मधोमध पलंग. समजा नवविवाहित दाम्पत्य या बेडरुममध्ये गेलं तर पकडापकडी खेळणार का? मध्ये पलंग का ठेवला? असं म्हणत त्यांनी तिथल्या बाथरुमचंही उदाहरण दिलं. ते म्हणाले इतके मोठे मोठे बाथरुम आहेत कळत नाही आंघोळ बसून करायची की पळत पळत? असा प्रश्न ठाकरेंनी उपस्थित केला आणि एकच हश्शा पिकला.

- Advertisement -

मुंबईतील प्रदूषण

राज ठाकरे म्हणाले की, कालच बातमी आली की मुबंई-पुण्यात प्रदूषणाचं प्रमाण वाढलंय. का? तर बेसुमार बांधकाम. मुंबईत कोस्टल रोड, उड्डाणपूल, रस्ते, इमारती बांधल्या जात आहे. एक एक पूल बांधायला सरकारला रामायण जितक्या वेळात घडलं तितका वेळ लागतो, असं म्हणत त्यांनी मिश्किल टोला लगावला.

महानगर पालिकांकडे टाऊन प्लॅनिंग नाही

राजाला सौंदर्यदृष्टी असेल तर खाली त्याचं संचित होतं. आपल्याकडे महानगर पालिकांकडे टाऊन प्ल‌‌ॅनिंग नाही. इंजिनीयरला जेवढं पालिकेत महत्त्व आहे. तेवढं आर्किटेक्चरला नाही.

महापालिकेत Development Planning होते पण Town Planning होत नाही. सौंदर्य दृष्टी सत्तेत असायला लागते. राज्यकर्त्याला ती असेल तर ती खाली पाझरते. महापालिकेत, शासनात इंजिनिअर्स असतात पण टाऊन प्ल‌ॅनर नसतात, असं राज ठाके म्हणाले.

इथे पाच पाच पुणे

राज ठाकरे म्हणाले की, मी गेल्या 25 वर्षांपासून पुण्यात येत आहे. मी हजार वेळा सांगितलं आहे. मुंबई बरबाद व्हायला काळ गेला, पण पुणे बरबाद व्हायला वेळ लागणार नाही. आज पुणे पुणे राहिलं कुठे? इथे पाच पाच पुणे आहेत. हिंजवडीकडचं पुणे वेगळं, इकडचं पुणे वेगळं. नदीकाठचं पुणे वेगळं. कुणाचा कशाला काही संबंधच उरलेला नाही. पुणे म्हणून कुठे काही राहिलं आहे? याच कारण राज्यकर्त्यांचं लक्ष नाही आहे, अशा शब्दांत राज ठाकरेंनी पुण्यातील परिस्थितीवर भाष्य केलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -