घरमुंबईAndhare On Rane : Dino Morea चा मोदींसोबतचा फोटो केला Tweet; म्हणाल्या-...

Andhare On Rane : Dino Morea चा मोदींसोबतचा फोटो केला Tweet; म्हणाल्या- आमच्या नितू बाळाला…

Subscribe

अभिनेते दिनो मोरिया याच्यावर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) केलेल्या कारवाईनंतर भाजप आमदार नितेश राणे आक्रमक झाले होते. सखोल तपास केल्यास अनेक 'पेंग्विन' बाहेर येतील, असेही राणे म्हणाले होते.

मुंबई : अभिनेता दिनो मोरिया (Dino Morea) मुंबई महानगरपालिकेशी (बीएमसी) संबंधित कोणतेही काम क्षणार्धात पूर्ण करू शकतो. असा आरोप भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केला होता. यावरून राणेंनी आदित्य ठाकरेंवरही निशाणा साधला होता. मात्र, अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी 25 डिसेंबरला त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी ख्रिसमस पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीला बॉलिवूड अभिनेता दिनो मोरियाने हजेरी लावली होती. या पार्टीतील मोदींसोबतचा मोरियाचा फोटो ट्वीट करत ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी नितेश राणेंवर हल्ला केला आहे. (Andhare On Rane  Dino Moreas photo taken with Modi Tweet Said our Nitu baby…)

अभिनेते दिनो मोरिया याच्यावर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) केलेल्या कारवाईनंतर भाजप आमदार नितेश राणे आक्रमक झाले होते. सखोल तपास केल्यास अनेक ‘पेंग्विन’ बाहेर येतील, असेही राणे म्हणाले होते. दिनो मोरिया हे बीएमसीचे सचिन वाजे असल्याचा दावा करत सर्व पुरावे त्यांच्याकडे आहेत असेही राणे म्हणाले होते. दिनो मोरियाचा हाच फोटो ट्वीट करत ठाकरे गटाच्या उपनेत्या यांनी नितेश राणेंवर जोरदार हल्ला केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा : BJP : ‘तिकिट मिळेलच या आशेवर राहू नका, काम करूनही मी…’; बावनकुळेंचा पदाधिकाऱ्यांना इशारा

- Advertisement -

काय म्हणाल्या सुषमा अंधारे ट्वीटमध्ये?

अभिनेता दिनो मोरिया याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतचा फोटो ट्वीट करत सुषमा अंधारेंनी लिहिले की, मला हे अज्जीबात म्हणजे अज्जीबात आवडलेलं नाहीय. दर वेळेला आमच्या नितू बाळाला असं तोंडघशी पाडायचं याचा अर्थ काय ? याच दिनो मोरियावरून नितू आणि समस्त भाजपच्या बार्किंग ब्रिगेडने किती उर बडवून घेतला होता असे लिहित नितेश राणे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांच्या या ट्वीटनंतर नितेश राणेंकडून आता अंधारेंना कसे उत्तर मिळते हे पहावे लागणार आहे.

हेही वाचा : PM Narendra Modi यांचे कार्यालय आहे तरी कसे? व्हिडीओतून दिसली पहिली झलक

दिनो मोरियानेच केला होता फोटो शेअर

दिनो मोरियाने मोदींसोबत ख्रिसमस पार्टी साजरी केल्याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोला कॅप्शनमध्ये मोरियाने लिहिले की, यंदाची ख्रिसमस पार्टी खूपच सूंदर होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी तुम्ही तुमच्या घरी ख्रिसमस पार्टीला बोलावलेत त्याबद्दल तुमचे आभार. तुमची भेट आणि तुमच्याशी संवाद खूपच संस्मरणीय होता, असे दिनो म्हणाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -