Monday, April 29, 2024
घरमानिनीReligiousShardiya Navratri 2023 : नवरात्रीत देवीला प्रसन्न करण्यासाठी करा 'या' ग्रंथाचं पठण

Shardiya Navratri 2023 : नवरात्रीत देवीला प्रसन्न करण्यासाठी करा ‘या’ ग्रंथाचं पठण

Subscribe

अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेला शारदीय नवरात्र साजरी केली जाते. हिंदू धर्मात नवरात्रीला महत्वाचे स्थान प्राप्त आहे. यंदा रविवार, 15 ऑक्टोबर पासून शारदीय नवरात्र सुरु होणार असून सोमवार, 23 ऑक्टोबर हा नवरात्रीचा शेवटचा दिवस असेल. तसेच 24 ऑक्टोबर रोजी दसरा साजरा केला जाईल.

हिंदू पुराणांच्या मते, नवरात्रीच्या 9 दिवसांच्या काळात देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. या काळात देवीच्या काही विशेष मंत्रांचा तसेच स्तोत्र आणि ग्रंथाचे देखील पठण केले जाते. ज्यामुळे देवीचा आशिर्वाद आपल्यावर निरंतर राहतो.

- Advertisement -

नवरात्रीमध्ये देवीची अशा प्रकारे पूजा

  • नवरात्री दरम्यान, जेव्हा तुम्ही देवीची पूजा करत असाल त्यावेळी तुमचे तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करा.
  • नवरात्रीमध्ये देवीला प्रसन्न करण्यासाठी घराच्या मुख्य द्वारावर दररोज स्वास्तिक चिन्ह तयार करा. मात्र, चिन्ह बनवताना यामध्ये चुना आणि हळदीचा वापर करा. तसेच हे चिन्ह दरवाज्याच्या दोन्ही बाजूला बनवा. तसेच घराच्या चौकटीवर आंबाच्या पानांचे तोरण देखील लावा.
  • पूजेमध्ये सुंगधी फुलांचा वापर करा. तसेच यासोबत वस्त्र, कुंकू, चंदन, साडी, चुनरीचा वापर करा.

नवरात्रीत देवीच्या या ग्रंथाचे करा पठण

  • नवरात्रीमध्ये देवीच्या दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे वाचन केले जाते. या ग्रंथामध्ये देवीचे माहात्म्य कथा सांगितलेली आहे. नवरात्रीत या ग्रंथाचे वाचन केल्यास देवीची असीम कृपा प्राप्त होते.
  • नवरात्रीमध्ये तुम्ही देवीच्या ओम दुम दुर्गायै नमः मंत्रांचा जप देखील करू शकता.
  • नवरात्रीमध्ये तुम्ही देवी चालीसेचे पठन देखील करू शकता.
  • यासोबत तुम्ही देवीच्या इतरही अनेक स्तोत्रांचे पठण करु शकता.

हेही वाचा :

Shardiya Navratri 2023 : नवरात्रीत करा देवीच्या ‘या’ मंत्राचा जप; होतील सर्व मनोकामना पूर्ण

- Advertisment -

Manini