Sunday, April 28, 2024
घरमानिनीReligiousदसऱ्याच्या दिवशी करा 'हे' चमत्कारी उपाय; होईल धनलाभ

दसऱ्याच्या दिवशी करा ‘हे’ चमत्कारी उपाय; होईल धनलाभ

Subscribe

अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातल्या दशमीला सर्वत्र दसरा साजरा केला जातो. विजयादशमी अर्थात दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. नऊ दिवसांच्या नवरात्रोत्सवाची दसऱ्याच्या दिवशी सांगता होते. या दिवशी देवीची पूजा केली जाते आणि रावण दहन सुद्धा केले जाते. यावर्षी 24 ऑक्टोबर, 2023 रोजी सर्वत्र दसरा साजरा केला जाणार आहे. देशभरातच दसऱ्याचा उत्साह दिसत आहे. दसऱ्याच्या निमित्ताने संपूर्ण भारतात प्रत्येक वर्षी रामलीला आणि रावण दहन केले जाते. ज्योतिष शास्त्रामध्ये विजया दशमीच्या दिवशी वास्तु शास्त्रामध्ये काही खास उपाय देखील सांगण्यात आले आहेत.

दसऱ्याच्या दिवशी करा ‘हे’ चमत्कारी उपाय

- Advertisement -
  • जव कडधान्याचे अंकुर
    वास्तु शास्त्रानुसार, विजय दशमीच्या दिवशी तिजोरी किंवा धन ठेवण्याच्या नवरात्रीच्या काळात जे जव कडधान्यातून अंकुर निघतात ते नवरात्रीचे घट उठल्यानंतर एका लाल कपड्यामध्ये थोडे जव तिजोरीमध्ये ठेवा.
  • रावण दहनाची राख
    दसऱ्याच्या दिवशी रावण दहनाची राख लाल किंवा लाकूड घरी घेऊन येणं खूप शुभ मानलं जातं. रावणाच्या पुतळ्याचे दहन झाल्यानंतर त्याचे राहिलेला छोटा लाकडाचा तुकडा किंवा राख आणून लाल कपड्यामध्ये बांधा आणि त्याला मुख्य दारावर बांधा. असं म्हणतात की, हा उपाय केल्याने नकारात्मक शक्ति घरापासून लांब राहतात.
  • झाडू चे दान
    विजया दशमीच्या दिवशी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी झाडूचे दान करणे शुभ मानले जाते आणि हा झाडू दान केल्याने कर्जापासून मुक्ति देखील होते आणि घरामध्ये कधीही धनाची कमतरता भासत नाही.
  • लक्ष्मी सूक्ताचा पाठ करा
    दसऱ्याच्या दिवशी श्री लक्ष्मी सूक्ताचे पाठ करणं अत्यंत शुभ मानलं जातं. हा उपाय केल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो आणि घरामध्ये देवी लक्ष्मीचा वास सदैव राहतो.
  • चारमुखी दीवा
    विजय दशमीच्या दिवशी संध्याकाळी दक्षिण दिशेला चारमुखी दिवा लावा. या उपायाने घरातील आर्थिक तंगी दूर होते. सगळी संकटं दूर होतात. हा उपाय कंगाल व्यक्तीलाही धनवान करू शकतो.

 


हेही वाचा : Shardiya Navratri 2023: देशभरात प्रसिद्ध आहेत ‘ही’ देवी दुर्गेची मंदिरे

- Advertisment -

Manini