घरमनोरंजनही कलियुगातील रावण... उर्फीचा नवा लूक पाहून चाहत्यांची कमेंट

ही कलियुगातील रावण… उर्फीचा नवा लूक पाहून चाहत्यांची कमेंट

Subscribe

आपल्या अतरंगी स्टाईलमुळे सतत चर्चेत असणाऱ्या उर्फी जावेदच्या अनोख्या स्टाईलचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात. अनेकजण तिच्या हटके स्टाईलचं कौतुक करतात तर काहीजण तिला प्रचंड ट्रोल देखील करत असतात. मात्र, उर्फी कोणालाही न घाबरता सडेतोड उत्तर देताना दिसते. दरम्यान अशातच, उर्फीचा आणखी एक नवा लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये उर्फीने एक नव्हे तर अनेक चष्मे घातलेले आहेत.

उर्फीचा आगळावेगळा लूक चर्चेत

 

View this post on Instagram

 

A post shared by Uorfi (@urf7i)

दसऱ्याच्या दिवशी उर्फीने देखील तिचा नवा लूक शेअर केला. यामध्ये उर्फीने नंगा नाच असं लिहिलेला टी-शर्ट आणि अतरंगी पँट घातली होती. सोबतच अनेक चष्मे डोळ्यांवर घातले होते. उर्फीचा हा लूक पाहून नेटकऱ्यांनी नेहमीप्रमाणे उर्फीचा खिल्ली उडवली आहे. एकाने कमेंटमध्ये उर्फीची रावणासोबत तुलना केली आहे तर दुसऱ्याने लिहिलंय की, दशाननची बहीण दशान्नी तर तिसऱ्याने लिहिलंय की, ‘असे, 10 डोकी असलेला रावण होता, मग एके दिवशी त्याला मारण्यात आले.’ असं म्हणत अनेकांनी उर्फीला ट्रोल केलं आहे.

- Advertisement -

दरम्यान, उर्फीला ‘बिग बॉस ओटीटी’मधून प्रसिद्धी खरी मिळाली. उर्फी ही बिग बॉसमध्ये फार काळ नव्हती. पण, बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर उर्फीने वेगळ्या फॅशन सेन्सने सर्वांचे लक्ष वेधले. यानंतर उर्फीला सोशल मीडियावर अल्पावधीत प्रसिद्धी मिळाली.


हेही वाचा : Photo : रणवीर-दीपिकाचं ब्लॅक आऊटफिटमध्ये जबरदस्त फोटोशूट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -