घरमहाराष्ट्रबनावट दसरा मेळावा पुढच्या वर्षी होणार नाही; राऊतांचं शिंदे गटावर टीकास्त्र

बनावट दसरा मेळावा पुढच्या वर्षी होणार नाही; राऊतांचं शिंदे गटावर टीकास्त्र

Subscribe

संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह संपूर्ण शिंदे गटाला लक्ष्य केलं आहे. शिवसेनेचा एकच दसरा मेळावा आहे. इतर मेळावे होत असतात. ते बनावट मेळावे आहेत. पुढच्या वर्षी हा मेळावा होणार नाही, असा दावा ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊतांनी यावेळी केला.

मुंबई: संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह संपूर्ण शिंदे गटाला लक्ष्य केलं आहे. शिवसेनेचा एकच दसरा मेळावा आहे. इतर मेळावे होत असतात. ते बनावट मेळावे आहेत. पुढच्या वर्षी हा मेळावा होणार नाही, असा दावा ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊतांनी यावेळी केला. (The fake Dussehra gathering will not take place next year 2024 Sanjay Raut criticism of the Shinde group and Cm Eknath Shinde)

राऊत म्हणाले की, बाडगा जरा मोठ्यानं बांग देत असतो. नपुंसक जास्त कांदे खात असतो. हात पसरवून बाळासाहेबांच्या बरोबर फोटो लागले आहेत त्याचे. पोटात कळ आल्यासारखा चेहरा केलाय फोटोमध्ये. लगेच जायचंय अशा हावभावाचा. बाळासाहेबांबरोबर असे फोटो लावण्याची आमची किंवा उद्धव ठाकरेंची कधी हिंमत झाली नाही. आम्ही शिवसेनेचे मालक नाही आहोत. आम्ही शिवसेनेचे विश्वस्त आहोत. हात पसरवून तुम्ही फडफड दाखवली आहे ना ती शेवटची आहे. तुमचा पुढचा दसरा मेळावा होणार नाही. तुम्ही बनावट लोक आहात. हा बनावट मेळावा आहे, असा टोलाही राऊतांनी यावेळी लगावला.

- Advertisement -

रावण हा अंहकारी होता आणि त्याचा नाश अहंकारानेच झाला. आज दसरा मेळावा त्या रावणाच्या आज अहंकाराचा नाश केल्याशिवाय राहणार नाही. 2024 च्या दसरा मेळाव्यावेळी दिल्लीत आणि महाराष्ट्रात शिवसेनेचे राज्यकर्ते बसले असतील. पुढच्या वर्षी शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार नाही, असं संजय राऊत म्हणाले.

 मोहन भागवतांवर टीका

संजय राऊत यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावरही टीका केली. मोहन भागवत लोकशाही मानत नाही का? या देशात भिन्न विचाराचे लोक येऊ नये का? मोहन भागवत यांना लोकशाहीचे आम्ही संरक्षक मानतो. या देशात भिन्न विचाराचे लोकांनी एकत्र येऊ नये का ? मी मोहनराव भागवतांना एक सांगू इच्छितो की, बाळासाहेब देवरस सरसंघ चालक हे आणीबाणीच्या काळात तुरुंगात होते. तेव्हा देखील भिन्न विचाराचे लोक एकत्र आले. तेव्हा भारतीय जनता पक्षदेखील होता. त्यांनी हुकूमशाहीचा पराभव केला, असं संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

मोहन भागवत यांना सांगण्याची गरज नाही. बहुदा त्यांना इतिहास माहीत असावा. या त्यांनी अडवाणींच्या आणीबाणीच्या काळात तुरुंगात होते. त्यांनी त्यांच्या पुस्तकात सर्व घटना उल्लेख केलेला आहे. ते पुस्तक मी मोहनराव भागवत यांना पाठवत आहे, असंही राऊत म्हणाले.

महाराष्ट्र हा ड्रग्जचा हब बनवला जात का? देशात लहान मुलांपर्यंत ड्रग्ज पोहोचलं जातं आहे. त्या रावणांकडून त्याचा बंदोबस्त करा. पंचवटीमध्ये सर्वात जास्त ड्रग्ज व्यापार सुरू आहे. हे देवेंद्र फडणवीस यांना माहिती नाही का? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

(हेही वाचा: फडणवीसांना फार कंठ फुटलाय, आधी ड्रग्जच्या रावणाला संपवा; राऊत संतापले)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -