Sunday, April 28, 2024
घरमानिनीRelationshipRelationship: मुलांना परिक्षेत कमी मार्क्स मिळाले तर कसं handle कराल?

Relationship: मुलांना परिक्षेत कमी मार्क्स मिळाले तर कसं handle कराल?

Subscribe

मुलांचा सांभाळ करणे हे फार कठीण असते. प्रत्येक आई-वडिलांना आपल्या मुलाने उत्तम आयुष्य जगावे म्हणून ते नेहमीच धडपड करत असतात. तसेच मुलाला सुद्धा काही गोष्टी शिकवल्या जातात. शालेय शिक्षण जसे सुरु होते तेव्हा त्याचा अभ्यास, ट्युशन, परिक्षा अशा सर्वच गोष्टींकडे अधिक लक्ष द्यावे लागते. काही मुल फार हुशार असतात. याउलट काही मुलं अशी असतात जे अभ्यास करायला कंटाळा करतात किंवा त्यांना तो करताना समस्या येतात. अशातच त्यांना परिक्षेत सुद्धा कमी मार्क्स मिळतात. असे झाल्याने पालक प्रचंड संतापतात आणि नको नको ते आपल्याला मुलाला बोलून जातात. हेच बोलणे कधीकधी मुलं डोक्यात ठेवतो. यावेळी पालकांनी जर मुलाला कमी मार्क्स मिळाले तर कसं हँन्डल केले पाहिजे याच बद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

-पालकांनी खुलेपणाने बोलावे
नापास झाल्याची लाज वाटत असल्याने मुल अधिक बोलत नाहीत. पण पालकांनी यावेळी त्याला समजून घेतले पाहिजे. मुलासोबत खुलेपणाने बोलावे. त्यांना विचारावे नक्की त्याला काय समस्या येत आहेत. जेव्हा तुम्ही असे कराल तेव्हा मुलं तुमच्याशी त्यांना येणाऱ्या समस्या जरुर सांगतील.

- Advertisement -

-पाठिंबा द्या
लहान मुलं आपल्या कठीण काळात कोणाचीही मदतमागत नाहीत. त्यावेळी पालकांनी त्यांच्याशी मित्रत्वाचे नाते तयार करत त्यांना सपोर्ट केला पाहिजे. नापास झाला आहे म्हणून त्याच्यावर रागवण्याऐवजी त्याला काही गोष्टी समजावून सांगितल्या पाहिजेत. तसेच त्याच्या अभ्यासाचा पॅटर्न कसा आहे हे सुद्धा पालकांनी जाणून घ्यावे.

-तणापासून दूर ठेवा
प्रत्येक मुलाला असे वाटत असते की, आपल्या पालकांना त्याने खुश ठेवावे. अशातच जर तो परिक्षेत नापास झाल्यास तर त्याला स्वत: ची लाज वाटते. यामुळे तो तणावाखाली जाऊ शकतो. अशातच पालकांनी ओवर रिअॅक्ट करण्याऐवजी त्याला तणावापासून कसे दूर ठेवता येईल याचा विचार पालकांनी करावा.

- Advertisement -

हेही वाचा- मुलांना confident बनवायचय, मग आधी स्वतःला लावा ‘या’ सवयी

- Advertisment -

Manini