घरमहाराष्ट्रBeach cleaning : मुख्यमंत्री शिंदेंचा ट्रॅक्टर अन् आदित्य ठाकरे विरुद्ध भाजयुमो...

Beach cleaning : मुख्यमंत्री शिंदेंचा ट्रॅक्टर अन् आदित्य ठाकरे विरुद्ध भाजयुमो…

Subscribe

मुंबई : प्रदूषणमुक्त, स्वच्छ आणि सुंदर मुंबईसाठी मुंबई महापालिकेने स्वच्छता मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शनिवारी समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता करण्यात आली. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सहभागी झाले होते आणि त्याचवरून ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे विरुद्ध भारतीय जनता युवा मोर्चा, असा सामना रंगला आहे.

हेही वाचा – BJP : ‘ओवैसी’छाप धर्मांध लोक असण्यावर भाजपाचे अस्तित्व, ठाकरे गटाचा हल्लाबोल

- Advertisement -

जुहू किनाऱ्यावर स्वच्छता मोहीम राबविली जात असताना मुख्यमंत्री शिंदे यांनी त्याची पाहणी केली. त्यानंतर ते स्वत: त्यात सहभागी झाले. समुद्र किनारा स्वच्छ करणारा ट्रॅक्टर मुख्यमंत्र्यांनी चालवला. त्यांचा हा फोटो व्हायरल झाला. त्यावरून राज्याचे माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी खिल्ली उडवली आहे. एकनाथ शिंदे यांचा हा फोटो खूपच हास्यास्पद आहे. बीच क्लीनिंगसाठी ते समुद्रात ट्रॅक्टर चालवत होते. त्याने काही उपयोग होणार आहे का? त्यांना पोझच द्यायची होती तर, वेगळ्या प्रकारे दिली असती. किमान मला तरी विचारायचे होते. इतक्या वर्षांची आमची ओळख आहे, एकमेकांना ओळखतो. तसेही ते आमच्या लोकांना फोन करून विचारतातच ना, येणार का, येणार का म्हणून! आदित्य तुम्ही किनारा सफाईचे काम करता तर, मलाही सांगा ते काम कसे केले जाते, असे मला फोन करून विचारायचे होते, असे सांगून आदित्य ठाकरे म्हणाले की, खरंतर या मुद्द्यावर काही बोलायचे नाही, असे मी ठरवले होते. कारण त्यांचा तो फोटो पाहून मला हसायलाच येते.

- Advertisement -

याशिवाय, ‘बीच क्लीनअपचा विचार एवढा ‘आऊट ऑफ द बॉक्स’ केला की, ट्रॅक्टरच पाण्यात नेला! राज्य पण असेच चालवत आहे, हे खोके सरकार, असे सांगत त्यांनी हा फोटो ट्वीटही केला आहे. यावरून शिंदे गट नाराज झाला असून त्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. आदित्य ठाकरे यांना काय वाटते यापेक्षा मुंबईकरांना काय वाटते, याच्याशी आम्ही बांधिल असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे.

हेही वाचा – Smriti Irani : ‘श्री रामासाठी दो धागे’ कार्यक्रमाकडे पुणेकरांची पाठ, रिकाम्या खुर्च्या पाहून स्मृती इराणी माघारी

पण आता या वादात भाजपाशी संबंधित भाजयुमो अर्थात भारतीय जनता युवा मोर्चाने उडी घेतली आहे. भाजयुमोचे अध्यक्ष तजिंदरसिंग तिवाना यांनी आदित्य ठाकरे यांच्या ट्वीटला प्रत्युत्तर दिले आहे. हा ट्रॅक्टर नाही, त्याला ‘बीच कॉम्बर’ सफाई मशीन म्हणतात. पर्यावरण मंत्री असताना तुम्ही काही शिकवण घेतली की, मृतदेहांवर भ्रष्टाचार करून घर भरण्यात मग्न होता? असा बोचरा सवाल त्यांनी केला आहे.

हेही वाचा – Telangana : ढोंग या शब्दाचा दुसरा अर्थ म्हणजे भाजपा, ठाकरे गटाची जोरदार टीका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -