घरमुंबईMumbai local train : मुंबई लोकलमध्ये विनयभंग करणाऱ्या आरोपीला 4 वर्षांनी शिक्षा,...

Mumbai local train : मुंबई लोकलमध्ये विनयभंग करणाऱ्या आरोपीला 4 वर्षांनी शिक्षा, पण…

Subscribe

मुंबई : मुंबईतील लोकलमध्ये 2019 मध्ये एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकणी मुंबईमधील महानगर दंडाधिकारी न्यायालयाने 49 वर्षीय पुरूषाला एक दिवसाची शिक्षा सुनावली आहे.

न्यायालयाने आरोपीला न्यायालयाची दिवसाचे कामकाज पूर्ण होईपर्यंत शिक्षा भोगण्याचे निर्देश देत अरोपीला 1000 रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. न्यायालयाने आरोपीचा त्याला या प्रकरणी गोवण्यात आल्याचा दावा मान्य करण्यास नकार दिला आहे. त्याचप्रमाणे महिलेचे अरोपीशी कोणतेही वैयक्तिक वैर नसल्याचं आरोपीच्या दाव्याने न्यायालयाने खंडन केले.

- Advertisement -

मिळाल्या माहितीनुसार 13 ऑगस्ट 2019 रोजी पीडित महिला लोकल ट्रेनने (प्रश्चिम रेल्वे) प्रवास करत होती. त्यादरम्यान आरोपींनी तिचा विनयभंग केला. त्यानंतर पीडित महिलेने आणि तिच्या भावाने आरोपीला शिवीगाळ करत आरोपीला वांद्रे रेल्वे पोलिस ठाण्यात नेले. रेल्व पोलिसांनी महिलेच्या तक्रारीनुसार आरोपीवर गुन्ह्याची नोंद केली. त्यानंतर इतर साक्षीदरांच्या पुराव्यावरून आरोपीवरचे आरोप सिध्द झाल्याने न्यायालयाने नमूद केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -