घरमनोरंजन'दहशतवादी खलनायक असतात, मुसलमान नाही', अदा शर्माचं वक्तव्य चर्चेत

‘दहशतवादी खलनायक असतात, मुसलमान नाही’, अदा शर्माचं वक्तव्य चर्चेत

Subscribe

द केरला स्टोरी या सिनेमामुळे अभिनेत्री अदा शर्मा लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचली. या सिनेमाने तिची फॅन फॉलोविंगही वाढली. काही दिवसांपूर्वीच तिचा ‘बस्तर: द नक्सल स्टोरी’ हा सिनेमाही रिलीज झाला. मात्र, हा चित्रपट त्याच्या मागील ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाप्रमाणे कमाल करू शकला नाही. सध्या सोशल मीडियावर अदा शर्माबद्दल लोक बरंच काही बोलत आहेत आणि त्याचं कारण म्हणजे राजकीय व्यक्तीमत्व बाबा सिद्दीकी यांनी नुकतीच मुंबईत रमजाननिमित्त इफ्तार पार्टी आयोजित केलेली ज्याला अदा शर्मा उपस्थित होती. इफ्तार पार्टीतील अदाच्या हजेरीची सोशल मीडियावर चर्चा झाली. काही नेटकऱ्यांनी अदाला ट्रोल केलं आहे. अशातच आता अदानं ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे.

अदाचा इफ्तार पार्टीतील व्हिडीओ ट्विटरवर (X) सोशल मीडियावर शेअर करुन एका नेटकऱ्यानं अदाला ट्रोल केलं. त्या नेटकऱ्यानं ट्वीटमध्ये लिहिलं, “ही किती फ्रॉड आहे, काही दिवसांसाठी मुस्लिम हे या लोकांसाठी खलनायक असतात आणि तुम्ही त्यांच्याविरुद्ध द्वेषपूर्ण चित्रपट बनवता आणि इतर दिवशी मुस्लिम हे या लोकांसाठी छान असतात कारण तुम्हाला बिर्याणी खाण्यासाठी ते आमंत्रित करतात.”

- Advertisement -

 अदानं नेटकऱ्याच्या या ट्वीटला सडेतोड उत्तर दिलं आहे. तिनं ट्वीटला रिप्लाय दिला, “सर, दहशतवादी व्हिलन असतात. मुस्लिम लोक खलनायक नसतात.”

एका यूजरने कमेंट करत लिहिले, ‘मॅम प्लीज मुस्लिमांविरुद्ध प्रोपगंडा फिल्म बनवू नका, मी तुमचा खूप मोठा फॅन आहे.’ अदाने उत्तर दिले, ‘आम्ही दहशतवाद्यांविरोधात फिल्म बनवली आहे. मला खात्री आहे की तुम्ही देखील त्यांच्या विरोधात आहात.

- Advertisement -

 अदा शर्मा ही केरळमधील महिलांच्या एका गटाच्या जीवनावर आधारित द केरळ स्टोरी या चित्रपटाचा भाग होती. सुदीप्तो सेन आणि विपुल शाह यांनी या चित्रपटाच्या माध्यमातून अशी कथा प्रेक्षकांसमोर आणली आहे, जी पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. या चित्रपटात अदा शर्मा, योगिता बिहानी, सोनिया बेलानी यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. केरळमधल्या हिंदू आणि ख्रिश्चन मुलींना लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकवून त्यांचं कशा पद्धतीने धर्मपरिवर्तन करण्यात आलं आणि ISIS चे दहशतवादी बनवण्यात आलं, याची कथा चित्रपटात दाखवण्यात आली आहे. हा चित्रपट दहशतवादासाठी धर्मातील हेराफेरीवर भाष्य करतो. हा चित्रपट मुस्लिमांच्या विरोधात असल्याचा दावा अनेकांनी केला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -