घरमहाराष्ट्रLoksabha 2024: संजय गायकवाड यांची बंडखोरी? लोकसभेसाठी भरला उमेदवारी अर्ज

Loksabha 2024: संजय गायकवाड यांची बंडखोरी? लोकसभेसाठी भरला उमेदवारी अर्ज

Subscribe

बुलढाणा: लोकसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक पक्षाने कंबर कसली आहे. महायुतीत अनेक जागांसंदर्भात अद्यापही तिढा कायम आहे. तर सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीतही वादाची ठिगणी पडलीय. त्यात आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या डोक्याचं टेंशन वाढलं आहे. कारण, बुलढाण्यात आमदार संजय शिरसाट यांनी पक्षाच्या विरोधात जात उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. (Loksabha 2024 Sanjay Gaikwad s Rebellion Filled nomination form for LokSabha)

शिंदे गटाकडून अद्याप एकाही उमेदवारांचं नाव जाहीर करण्यात आलेलं नाही. मात्र, तत्पूर्वीच शिंदेंच्या आमदारानं मात्र त्यांचं टेन्शन वाढवलं आहे. बुलढाण्यात विद्यमान खासदार शिंदे गटाचे आहेत. मात्र, असं असतानाही याच मतदारसंघातील शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आज थेट लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. संजय गायकवाडांनी उचललेल्या या पावलामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

- Advertisement -

अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी आज गुरुवारी आमदार गायकवाड यांनी दुपारी 2 च्या सुमारास अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्या समवेत शिंदे गटाचे समर्थक हजर होते. तर मित्रपक्ष राष्ट्रवादी व भाजपाचे पदाधिकारी हजर नव्हते.

( हेही वाचा NCP : राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; अजित पवारांसह 37 जणांचा समावेश )

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -