घरमहाराष्ट्रअजित पवारांचा वाढता हस्तक्षेप रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी घेतला 'हा' निर्णय

अजित पवारांचा वाढता हस्तक्षेप रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी घेतला ‘हा’ निर्णय

Subscribe

मुंबई : अजित पवार हे महायुतीत सामील झाल्यापासून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अस्वस्थ आहेत.
अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री विराजमान झाल्यापासून बैठकींचा धडाकाल लावला आहे. त्याचबरोबर अजित पवार हे शासकीय कामाजात हस्तक्षेप देखील वाढला आहे. यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांच्या हस्तेक्षपाबाबत महत्वाचा निर्णय घेतला आहे. अजित पवारांकडून येणाऱ्या फाईल सर्वप्रथम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जातील. यानंतर मुख्यमंत्र्यांकडे येतील, असा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 2 जुलै रोजी फूट पडल्यानंतर एक गट अजित पवारांसोबत शिंदे-फडणवीसांसोबत सत्तेत सामील झाला. यानंतर अजित पवार हे उपमुख्यमंत्री आणि त्यांच्यासोबत आलेल्या राष्ट्रवादीच्या 9 आमदारांना मंत्रीपद मिळाले. यामुळे शिंदे गटात नाराजी असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. पण अजित पवारांनी उपमुख्यमंत्री झाल्यापासून वेगवेगळ्या विभागाच्या बैठका घेत आहेत. यामुळेच मुख्यमंत्र्यांच्या कारभारात हस्तक्षेप करत असल्याच्या चर्चा सुरू आहेत. अजित पवारांनी स्वाक्षरी केलेल्या फाईल्स यापुढे फडणवीसांकडे जातील. यानंतर अंतिम मंजुरीसाठी मुख्यमंत्र्यांकडे येतील, असा निर्णय मुख्यमंत्र्यांन अजित पवारांचा शासकीय कामातील हस्तक्षेप रोखण्यासाठी घेतला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – पुण्याच्या पालकमंत्रीपदाबाबत अजित पवार म्हणाले, ‘तुझ्या तोंडात साखर पडो…’

अजित पवारांच्या ‘त्या’ शब्दाने पालकमंत्री पदाच्या चर्चा

पुण्याच्या पालकमंत्री पदावरून देखील राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. सध्या पुण्याचे पालकमंत्री हे भाजपचे नेते चंद्रकांत पाटील आहेत. नुकतेच पुण्याच्या पालकमंत्री पदसंदर्भात अजित पवारांना पत्रकारांन प्रश्न केल्यावर ते म्हणाले, “तुझ्या तोंडात साखर पडो”, असे म्हणत पालकमंत्री होण्याची मनातील व्यक्त झाली. आमुफे पुन्हा एकदा पालकमंत्री पदाच्या चर्चा राजकीय वर्तुळता रंगलू लागल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -