घरलाईफस्टाईल'या' देशात लग्न करणाऱ्या जोडप्याला सरकार देतेयं पैसे

‘या’ देशात लग्न करणाऱ्या जोडप्याला सरकार देतेयं पैसे

Subscribe

चीन सरकार तेथील जन्मदर कमी होत असल्याने चिंतेत आहे. अशातच तरुणांना लग्न करण्याठी आता सरकार प्रोत्साहन देत असून त्यासाठी अनोखा उपाय शोधून काढला आहे. खरंतर चीन सरकार 25 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी वयातील नववधुला लग्नासाटी 1000 युआन ($137) रुपये देत आहे. खरंतर हे पैसे सरकार बक्षीस म्हणून लग्न करणाऱ्या जोडप्याला देत आहे.

चांगशन काउंटीच्या अधिकृत वीचॅट अकाउंटवर एक नोटीस जारी केली गेली. त्यात असे म्हटले की, हे बक्षीस योग्य वयातील मुलं जन्माला घालण्यासह लग्न करण्यासाठी दिले जात आहे. गेल्या सहा दशकांमध्ये पहिल्यांदा लोकसंख्येत फार मोठी घट झाल्याचे दिसून आले. तर वयस्कर व्यक्तींची लोकसंख्या चीनसाठी चिंतेचा विषय बनला होता. सरकारने यावर तोडगा काढण्यासाठी तत्काळ हा उपाय शोधला आहे.

- Advertisement -

चीनमध्ये लग्नासाठी कायदेशीर वय पुरुषांसाठी 22 वर्ष आणि महिलांसाठी 20 वर्ष आहे. मात्र लग्न करणाऱ्या जोडप्यांच्या संख्येत घट झाली आहे. अधिकृत नीतिंच्या कारणास्तव जन्मदरात सुद्धा घट झाली आहे. जूनमध्ये शासकीय आकडेवारीनुसार 2022 मध्ये विवाह 6.8 मिलियनवर पोहचला आहे. जो 1986 नंतर सर्वाधिक कमी आहे. वर्ष 2021 च्या तुलनेत 2022 मध्ये 800,000 कमी लग्न झालेत.

- Advertisement -

चीनच्या मीडियाने असे सांगितले की, चीनचा प्रजनन दर पहिल्यांदाच कमी झाला आहे. 2022 मध्ये कमी होऊन 1.09 रेकॉर्ड खालच्या स्तरावर पोहचला. मुलांची काळजी घेण्यासाठी खुप खर्च आणि आपल्या करियरसाठी महिला मुलं जन्माला घालण्यापासून दूर राहत आहेत.


हेही वाचा- कूकने सांगितलं जपानी लोकांच्या दीर्घ आयुष्याचं रहस्य

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -