Saturday, December 9, 2023
घरमानिनीReligiousDiwali 2023 : सकारात्मकतेसाठी दिवाळीत अशी करा घराची सजावट

Diwali 2023 : सकारात्मकतेसाठी दिवाळीत अशी करा घराची सजावट

Subscribe

दिवाळी म्हटलं की सर्वात आधी सगळेजण घराची साफ सफाई करण्याकडे लक्ष देतात. घराची साफ सफाई पूर्ण झाल्यानंतर घराची सजावट करण्याचे काम सुरु होते. यावेळी अनेकजण घराला नवीन रंग देतात. तसेच यामध्ये घरात नवीन पडदे बदलले जातात. अनेक नवनवीन गोष्टींनी घर सुंदर सजवले जाते. मात्र, यामध्ये एक गोष्ट अशी आहे जी पुरातन काळापासून बदललेली नाही ती म्हणजे मुख्य दारावर लावले जाणारे तोरण. आधुनिक काळात नवनवीन तोरण वापरले जातात. तोरणामुळे मुख्य दार उठून दिसते.

दिवाळीच्या दिवशी अशी करा घराची सजावट

- Advertisement -

Be Inspired By These 20 Diwali Party Decoration Ideas - HomeLane Blog

 

- Advertisement -
 • घरामध्ये आणि घराबाहेर काढा सुंदर रांगोळी
  दिवाळीच्या दिवशी घरामध्ये आणि घराबाहेर रांगोळी काढणं शुभ मानले जाते. घराबाहेरील रांगोळी देवी लक्ष्मीचे स्वागत करते. तर घरामध्ये काढलेली रांगोळीमुळे कुटुंबामध्ये सुख-समृद्धी येते. घरामध्ये तुम्ही लहान फुलांची रांगोळी देखील काढू शकता.
 • स्वयंपाक घराची करा पूजा
  दिवाळीच्या दिवशी स्वयंपाक घरातील शेगडीची पूजा करा. तसेच स्वयंपाक घरामध्ये देखील दिवा लावा. असं म्हणतात की, स्वयंपाक घरामध्ये देवी अन्नपूर्णेचा वास असतो. त्यामुळे या दिवशी तिची देखील पूजा करा.

Diwali Decoration Ideas for 2023 | Unique and Beautiful Ideas to Style up Your Home

 • घराबाहेर झेंडूच्या फुलांचे आणि आंब्यांच्या पानांचे तोरण बांधा
  दिवाळीच्या दिवशी घराबाहेर चौकटीला झेंडूच्या फुलांचे आणि आंब्यांच्या पानांचे तोरण बांधनं शुभ मानले जाते. यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.
 • मुख्य दारावर स्वास्तिक चिन्ह काढा
  दिवाळीच्या दिवशी मुख्य दार स्वच्छ करुन दारावर कुंकवाचे स्वस्तिक काढा. या दिवशी मुख्य दाराची पूजा देखील करा.
 • पूर्वजांच्या फोटोला फुलांची माळ घाला
  दिवाळीच्या दिवशी घरातील पूर्वजांच्या फोटोला ताज्या फुलांची माळ घाला. तसेच त्यांच्यासमोर एक दिवा देखील लावा.

हेही वाचा :

Diwali 2023 : लक्ष्मीपूजनसाठी हवी ‘अशी’ मूर्ती; होईल धनलाभ

- Advertisment -

Manini