Sunday, April 28, 2024
घरमानिनीReligiousदेवी लक्ष्मीच्या 'या' आहेत प्रिय राशी; कमावतात भरपूर पैसा

देवी लक्ष्मीच्या ‘या’ आहेत प्रिय राशी; कमावतात भरपूर पैसा

Subscribe

ज्योतिष शास्त्रातील 12 राशींवर वेगवेगळ्या ग्रहाचा तसेच वेगवेगळ्या देवी-देवतांचा आशिर्वाद प्राप्त असतो. अशाच काही राशींवर देवी लक्ष्मीची विशेष कृपा असते. ज्यामुळे त्या व्यक्तींना आयुष्यात कधीही आर्थिक समस्येचा सामना करावा लागत नाही. शिवाय त्यांच्या आयुष्यातील मनोकामना देवी लक्ष्मी लवकर पूर्ण करतात.

देवी लक्ष्मीच्या ‘या’ आहेत प्रिय राशी

51+ Jay Lakshmi Devi Photos | Goddess Lakshmi Devi Images

- Advertisement -
  • वृषभ

वृषभ राशीचा स्वामी शुक्र ग्रह आहे. ज्योतिष शास्त्रात शुक्र ग्रहाला सुख-समृद्धीचा कारक ग्रह मानला जातो. त्यामुळे ही रास देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय असते.

  • कर्क

कर्क राशीवर देखील देवी लक्ष्मीची कृपा असते. कर्क राशीचा स्वामी चंद्र ग्रह आहे. ज्योतिष शास्त्रात चंद्राला धन-संपत्तीचा कारक ग्रह मानला जातो. या राशीच्या व्यक्तींना भाग्यवान मानले जाते.

- Advertisement -
  • सिंह

सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे. सूर्य देव सर्व ग्रहांचा राजा आहे. त्यामुळे या व्यक्ती खूप उत्साही आणि दृढनिश्चयी असतात. यांच्यावर देखील देवी लक्ष्मीचा आशीर्वाद असतो.

  • तूळ

तूळ राशीचा स्वामी शुक्र ग्रह आहे. ज्योतिष शास्त्रात शुक्र ग्रहाला सुख-समृद्धीचा आणि सौंदर्याचा कारक ग्रह मानला जातो. त्यामुळे या व्यक्तींना आयुष्यात कधीही आर्थिक समस्येचा सामना करावा लागत नाही.

  • वृश्चिक

वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ ग्रह आहे. मंगळ ग्रह शौर्य, पराक्रमाचा कारक ग्रह आहे. या राशींच्या व्यक्तींवर देखील देवी लक्ष्मीची अपार कृपा असते.

 


हेही वाचा : ‘या’ आहेत महादेवांच्या प्रिय राशी; करतात सर्व मनोकामना पूर्ण

- Advertisment -

Manini