घरक्राइमआदिवासी मुलींच्या शोषणाप्रकरणी सर्वहरा केंद्राविरुद्ध गुन्हा दाखल; रिसॉर्टही केले सील

आदिवासी मुलींच्या शोषणाप्रकरणी सर्वहरा केंद्राविरुद्ध गुन्हा दाखल; रिसॉर्टही केले सील

Subscribe

नाशिक : पहिने येथील खासगी संस्थेच्या वसतिगृहातील अल्पवयीन मुलींना पर्यटकांसमोर जबरदस्तीने नाचण्यास सांगितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे पालकांनी मुलींना घरी आणले असून, या प्रकरणी संस्थेचे चालक आणि शिक्षिकेविरुद्ध वाडीवहे पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. त्र्यंबकेश्वर तहसीलदारांनी रिसॉर्ट सील केले. यावेळी विभागीय पोलीस अधीक्षक, वाडीवर्‍हे व त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

याप्रकरणी मोतीराम जांजर यांनी वाडीवर्‍हे पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी संशयित राजू ऊर्फ वादीराज भीमराव नाईक, माधुरी गवळी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पहिने येथेसर्वहारा परिवर्तन केंद्र या संस्थेची काही वर्षांपासून कायमस्वरूपी विनाअनुदानित इंग्रजी माध्यमाची प्राथमिक शाळा आहे. या शाळेला जोडून यंदा मुलींसाठी वसतिगृह सुरू करण्यात आले. शाळा सुरू होण्यास पंधरा दिवसांचा अवधी असताना वसतिगृहात सातवी ते नववीच्या विद्यार्थिनींना ३१ मे २०२३ पासूनच प्रवेश देण्यात आला. सुटीत मुलींना पारंपरिक नृत्य व संगणक शिक्षण दिले जाणार असल्याचे संस्थेने सांगितले होते. प्रत्यक्षात संगणक शिक्षण दिले नसल्याचा आरोप मुलींनी केला.

- Advertisement -

संस्थेची सहावीपर्यंतच शाळा असल्याने या मुलींना त्र्यंबकेश्वर येथील शाळेत शिक्षणासाठी पाठविले जाते. पालकांनी मुलींसाठी प्रत्येकी ३ हजार ५०० रुपये अनामत रक्कम जमा केली. या संस्थेच्या शाळेमागील टेकडीवर हॉटेल असून, तेथे मे महिन्याच्या अखेरीस काजवे पाहण्यासाठी पर्यटक येतात. त्यांच्यासमोर सायंकाळी सहा ते रात्री नऊदरम्यान नाचण्यास सांगितले जाते. नाचले नाही तरी शिक्षिका संस्थाचालकांच्या सांगण्यावरून दमदाटी करतात व छड्या मारतात, अशी तक्रार मुलींनी पालकांकडे केली. पालकांनी वाडीवर्‍हे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. या मुलींना आता दुसर्‍या शाळेत दाखल केल्याचे पालकांनी सांगितले. वसतिगृहाच्या शिक्षिका मुलींना पारंपरिक नृत्य शिकवत असताना पर्यटक ते पाहत असतील; परंतु मुलींना कोणत्याही प्रकारे इतरांसमोर नाचण्यास सांगितलेले नाही, असा दावा एका शिक्षकाने केला.

तपासासाठी एसआयटी स्थापन करा

पर्यटकांसमोर मुलींना बळजबरीने नाचविल्याप्रकरणी संबंधित संस्थाचालक अध्यक्ष, राजू नाईक व सचिव, आबासाहेब थोरात व त्यांना साथ देणार्‍या व्यक्तींवर गुन्हे दाखल करावेत, त्यांना तात्काळ अटक करावी, या प्रकरणावर गृहमंत्री य देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी नेमावी, अशा मागण्या आदिवासी कोळी महादेव समाज विकास संघटनेने त्र्यंबकेश्वर तहसीलदार व पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाव्दारे केल्या. संबंधितांवर कारवाई न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही इशारा देण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -