घरताज्या घडामोडीशिंदेंच्या 'त्या' दाव्या संदर्भात शिवसेनेचे दोन मंत्री भिडले, अंतर्गत वाद चव्हाट्यावर

शिंदेंच्या ‘त्या’ दाव्या संदर्भात शिवसेनेचे दोन मंत्री भिडले, अंतर्गत वाद चव्हाट्यावर

Subscribe

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बंडाळीला वर्षपूर्ती झाली आहे. मात्र, ठाकरे गटासह राजकीय वर्तुळातून आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. दोन दिवसांपूर्वी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी एकनाथ शिंदे यांच्याबाबत मोठा खुलासा केला होता. आमदारांनी केलेला उठाव यशस्वी झाला नसता, तर एकनाथ शिंदे यांनी गोळी झाडून घेतली असती, असा खळबळजनक दावा दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी केला होता. त्या दाव्यावरून शिवसेनेचे दोन मंत्री आपापसांत भिडले. त्यामुळे अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.

शिंदे हे कधीही तणावात नव्हते

एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मंत्री संदीपान भुमरे यांनी केसरकरांच्या दाव्याचं खंडन करत त्यांच्यावर निशाणा साधला आहे. बंडाच्या काळात मी सतत एकनाथ शिंदे यांच्यासोबत होतो. त्यावेळी ज्या काही घडामोडी होत होत्या, त्याची मला संपूर्ण माहिती होती. बंडाच्या काळात शिंदे हे कधीही तणावात नव्हते. तसेच बंड फसलं तर स्वत:वर गोळ्या घालून आत्महत्या करेन, असं काहीच ते बोलले नव्हते, असं म्हणत संदीपान भुमरे यांनी दीपक केसरकर यांच्या वक्तव्यानंतर घुमजाव केला आहे.

- Advertisement -

काय म्हणाले होते दीपक केसरकर?

मंगळवारी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत दीपक केसरकर बोलत होते. यावेळी त्यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी एकनाथ शिंदेंनी बंड केलं. तुम्ही कोणाला गद्दार म्हणताय? माझे आणि एकनाथ शिंदे यांच्याशी अत्यंत जवळचे संबंध आहेत.उद्धव ठाकरे वचन द्यायचे आणि तोडायचे. एकनाथ शिंदे यांनी निश्चितपणे उठाव केला. नंतर एकनाथ शिंदेंना वाटलं, ही सर्व लोकं माझ्याबरोबर प्रेमाने आली आहेत. कारण, शिंदेंचा अपमान झाला, तो दिवस वर्धापनदिनाचा होता. वर्धापनदिनादिवशीच एक नंबरच्या शिलेदाराचा अपमान केला.शिंदेंना खालच्या दर्जाची वागणूक दिली. एकनाथ शिंदे रागवून गेले असते, तर परत येण्याची तयारीही दाखवली होती, असं दीपक केसरकर म्हणाले.

एकनाथ शिंदे हे एक सच्चे शिवसैनिक आहेत. एकनाथ शिंदेंनी म्हटलं की, मला जेव्हा वाटलं उठाव यशस्वी होणार की नाही, तेव्हा मी एकच गोष्ट केली असती. माझ्याबरोबर आलेल्या सर्व आमदारांना परत पाठवलं असतं. त्यानंतर मी उद्धव ठाकरेंना एक फोन केला असता, माझी चूक झाली आहे. यांची काही चूक नाही आणि तिथेच माझ्या डोक्यात गोळी झाडून घेतली असती, असं शिंदेंनी सांगितल्याचं दीपक केसरकर म्हणाले.

- Advertisement -


हेही वाचा : ‘बंड यशस्वी झाले नसते तर एकनाथ शिंदेंनी डोक्यात…’, कॅबिनेट मंत्र्यांचा मोठा गौप्यस्फोट


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -