Hindu Shastra : श्रावणात चुकूनही करू नका ‘या’ चुका; नाहीतर व्रताचे मिळणार नाही फळ

हिंदू धर्मात श्रावण महिन्याला अत्यंत पवित्र मानले जाते. या महिन्यात अनेकजण भगवान शंकरांची पूजा-आराधना करतात. त्यांचे ग्रंथ, मंत्रांचा जप करतात. तसेच भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी शिव मंदिरात दूध, बेल, फळ, सफेद फुलं, धतूरा हे अर्पण करतात. मात्र भगवान शंकरांची पूजा करताना महिलांनी विशेष काळजी घेणं गरजेचं असतं. कधी कधी भगवान शंकरांची पूजा करताना कळत-नकळत चुकून काही मोठ्या चुका करतात.

भगवान शंकरांची पूजा करताना या चूका करू नका

 • शिवलिंगावर हळद लावू नका
  शिवलिंग हे पुरूष तत्वाशी संबंधित असते. त्यामुळे कधीही शिवलिंगावर हळद लावू नये. तुम्ही श्रावणात शिवलिंगावर बेलपत्र, भांग, गंगाजल, दूध, चंदन, भस्म इ. अर्पित करू शकता.
 • शिवलिंगाला स्पर्श करू नका
  शास्त्रानुसार, भगवान शंकरांच्या पूजे दरम्यान महिलांनी कधीही शिवलिंगाला स्पर्श करू नये. अशी मान्यता आहे की, महिलांनी शिवलिंगाला स्पर्श केल्यास देवी पार्वती नाराज होतात.
 • काळे वस्त्र परिधान करू नका
  श्रावण महिन्यामध्ये जर तुम्ही सोमवारचे व्रत करत असाल तर चुकूनही तुम्ही काळ्या रंगाचे कपडे परिधान करू नका. शास्त्रात काळ्या रंगाला नकारात्मक ऊर्जेचं प्रतीक मानले जाते. भगवान शंकरांची पूजा करताना सफेद, लाल किंवा पिवळा रंग परिधान करणं शुभ मानले जाते.
 • या गोष्टींचे सेवन करू नका
  श्रावणात महिलांनी चुकूनही वांग, पालेभाज्या, लसूण, कांदा, मांस आणि दारू यांचे सेवन करू नका. श्रावणात पूर्णपणे सात्विक आहार करावा.
 • चुगली किंवा कोणाची निंदा करू नका
  कोणत्याही व्रतामध्ये शारीरिक आणि मानसिक रूपाने साधना करण्याचे तसेच आपल्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवण्यास सांगितले जाते. श्रावण महिन्यामध्ये कोणाबद्दलही वाईट विचार करू नये. असं केल्यास व्रताचे पूर्ण फळ तुम्हाला मिळत नाही.

हेही वाचा :Hindu Shastra : मंदिराबाहेरून चप्पल चोरी झाल्यास मानले जाते शुभ