Monday, April 29, 2024
घरमानिनीHealthBelly Button मधून येणारी दुर्गंधी इन्फेक्शनचे कारण तर नाही?

Belly Button मधून येणारी दुर्गंधी इन्फेक्शनचे कारण तर नाही?

Subscribe

बेली बटण म्हणजेच नाभी हा आपल्या शरिराचा असा भाग जो आपल्याला काही हेल्थ समस्यांपासून बचाव करतो. त्याचसोबत आजारांचे संकेत ही देतो. काही वेळेस पुरेशी स्वच्छता केली नाही तर बेली बटण मधून दुर्गंधी येऊ लागते. खरंतर बेली बटण मधून दुर्गंधी येणे ही एक सामान्य बाब आहे. मात्र अधिक दुर्गंधी येत असेल तर समजून जा हे एखाद्या इन्फेक्शनचे लक्षण असू शकते. बेली बटण इन्फेक्शन घाण आणि बॅक्टेरियाच्या निर्मितीचे कारण ठरू शकते. या व्यतिरिक्त बेली बटणमधून येणारी दुर्गंधी यीस्ट इन्फेक्शचे कारण सुद्धा असू शकते. यावर वेळीच उपचार केला पाहिजे. सर्वसामान्यपणे अशा प्रकारची दुर्गंधी काही घरगुती उपायांनी दूर करता येऊ शकते. (Belly button infection)

इन्फेक्शनचे काय कारण आहे?
-बॅक्टेरियल इन्फेक्शन
बॅक्टेरियल इन्फेक्शन होण्याचे मुख्य काऱण लिंट, घाम आणि कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचा अधिक वापर. बॅक्टेरियल इन्फेक्शन झाल्यास बेली बटण मधून पिवळ्या रंगाचा डिस्चार्ज सुद्धा निघू शकतो.

- Advertisement -

-फंगल इन्फेक्शन
फंगल इन्फेक्शन शरिरातील कोणत्याही ठिकाणी होऊ शकते. जर नाभीत खाज किंवा लालसर झाले असेल तर फंगल इन्फेक्शन होण्याचे संकेत आहेत.

-डायबिटिक इन्फेक्शन
मधुमेह असलेल्या रुग्णांना बेली बटण इन्फेक्शन होण्याची शक्यता अधिक असते. इन्फेक्शन झाल्यास नाभीतून सफेद रंगाचा डिस्चार्ज बाहेर पडू शकतो. ब्लड शुगरचे प्रमाण वाढल्यानंतर इन्फेक्शन अधिक वाढू शकते.

- Advertisement -

घरगुती उपाय
-मीठाचे पाणी
मीठाचे पाणी तुम्हाला बेली बटणामध्ये असलेला ओलावा कमी करण्यास मदत करते. त्यामुळे इन्फेक्शन वाढण्यापासून तुम्ही दूर राहता. मीठात अँन्टी इंफ्लेमेटरी गुण असतात जे खाज आणि सूजेला कंट्रोल करण्यास मदत करतात. गरम पाण्यात मीठ टाकून तुम्ही ती जागा स्वच्छ करू शकता.

-हळद
बेली बटणमधील इन्फेक्शन दूर करण्यासाठी तुम्ही हळदीचा वापर करू शकता. यामधअये करक्युमिनचे प्रमाण अधिक असते. जे शक्तिशाली अँन्टीमाइक्रोबियल आणि अँन्टी-इंफ्लेमेटरी प्रॉपर्टीज खुप असतात. यामुळे सूज, खाज आणि जळजळ दूर होते. याचा वापर करण्यासाठी तुम्ही एक चमचा हळद आणि पाणी घेऊन त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट बेली बटणावर लावा. काही वेळानंतर ती पेस्ट धुवून टाका.

-एलोवेरा जेल
एलोवेरा जेल मध्ये अधिक अँन्टी इंफ्लेमेटरी गुण असतात. जे खाज आणि लालसरपणा कमी करण्यास मदत करतात. याचा वापर थेट इंफेक्टेड एरियात केला जाऊ शकतो.

-एसेंशियल ऑइल
नाभीचे इन्फेक्शन दूर करण्यासाठी तुम्ही एसेंशियल ऑइलचा वापर करू शकता. यामध्ये अँन्टीफंगल आणि अँन्टी-इंफ्लेमेटरी गुण असतात, जे इन्फेक्शन कमी करण्यास मदत करतात. इन्फेक्शन कमी करण्यासाठी तुम्ही टी ट्री ऑइल, पेपरमिंट ऑइल आणि नारळाचे तेल वापरू शकता.


हेही वाचा- ओल्या आणि घट्ट panty मुळे होते itching

- Advertisment -

Manini