Saturday, April 27, 2024
घरमानिनीHealthमहिलांमध्ये 'ही' लक्षणं दिसत असल्यास वंधत्व येऊ शकते

महिलांमध्ये ‘ही’ लक्षणं दिसत असल्यास वंधत्व येऊ शकते

Subscribe

महिलांना वंधत्व येणे ही एक गंभीर समस्या मानली जाते. या स्थितीत प्रजनन क्षमता कमी झाल्यााने कपल्ससला कंसीव करण्यास समस्या येतात. तज्ञांनुसार, महिलांमध्ये वंधत्व येण्याची काही कारणे असू शकतात. जसे की ओव्युलेशन डिसऑर्डर, अँन्ड्रोमेट्रियोसिस, युटेरस किंवा सविर्क्स संबंधित समस्या. परंतु वंधत्वाची कारणे वेळीच कळली तर त्यावर उपचार करुन ते दूर करता येते. महिलांमध्ये वंधत्वासंदर्भात पुढील काही लक्षण दिसून आल्यास तर वेळीच काळजी घ्या.

-एंडोमेट्रियोसिस
काही महिलांमध्ये मासिक पाळीदरम्यान कंबर फार दुखते किंवा दुखतच नाही. पण बहुतांश महिला अशा असतात ज्यांना मासिक पाळीवेळी फार दुखते. या व्यतिरिक्त मासिक पाळी खुप दिवस राहते. एंडोमेट्रियोसिस अशी एक समस्या आहे ज्यामध्ये युटरेसच्या आतमधील टिश्यू गर्भाशयाबाहेर पसरु लागतो. हे टिश्यू अंडाशय, फॅलोपियन ट्युब आणि युटरेसच्या बाहेरील भागात आणि दुसऱ्या भागात ही पसरु शकते. ही समस्या झाल्यास मासिक पाळीवेळी खुप दुखते. अनियमित पीरियड्स येणे, स्पॉटिंग, क्रोनिक पॅल्विक दुखणे अशी काही त्याची लक्षण आहेत.

- Advertisement -

-पीरियड सायकल मध्ये अनियमितता 
मासिक पाळीत अनियमितता असेल तुम्ही वंधत्वाची समस्या होऊ शकते. अनियमित मासिक पाळीमुळे ओव्युलेशन नियमित रुपात होतन नाही. पॉलीसिस्टिक ओवेरियन सिंड्रोम (पीसीओएस), लठ्ठपणा, कमी वजन आणि थायरॉइडच्या समस्येसह काही फॅक्टर्सच्या कारणास्तव ओव्युलेशनमध्ये अनियमितता येऊ शकते.

-हार्मोनल प्रॉब्लेम्स
हार्मोनमध्ये बदल झाल्यास शरिरात काही प्रकारची लक्षण दिसतात. यामध्ये पिंपल्स येणे, हात-पाय थंड पडणे, सेक्स ड्राइव्हमध्ये कमतरता, सेक्स करण्याची इच्छा न होणे, चेहऱ्यावर केस वाढणे, केस पातळ होणे, वजन वाढणे. अशी लक्षण दिसून आल्यानंतर डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकतात.

- Advertisement -

-सेक्स दरम्यान दुखणे
डिस्पेर्युनिया किंवा सेक्स दरम्यान दुखणे अशी एक समस्या असते जी महिलांच्या प्रजननन क्षमतेवर प्रभाव टाकू शकते. इंफेक्शन, एंडोमेट्रियोसिस आणि फाइब्रॉएड अशी एक समस्या आहे ज्यामध्ये सेक्स दरम्यान दुखते.

-लठ्ठपणा
लठ्ठपणाने ग्रस्त असलेल्या महिलांना प्रग्रेंसीवेळी समस्या येऊ शकते. दुसऱ्यांच्या तुलनेत प्रेग्नेंसीच्या दरम्यान समस्या होण्याची शक्यता अधिक असते.

-अन्य समस्या
पीसीओएस, वया आधीच मेनोपॉज, कॅन्सरवरील उपचार, ओवरीज, एंडोमेट्रियोसिस अशा समस्या सुद्धा वंधत्वाची कारणं असू शकतात.

तज्ञांनुसार, एक हेल्दी लाइफस्टाइल वंधत्वाची समस्या काही मर्यादेपर्यंत कमी करु शकता. त्यामुळे अधिक प्रमाणात कॅफेनचे सेवन करणे, दारु आणि धुम्रपान पासून दूर राहणे, वजन नियंत्रणात ठेवणे अशा काही गोष्टींची काळजी घेतल्यास वंधत्वाची समस्या कमी होऊ शकते.


हेही वाचा- महिलांनी Vigra खाल्ल तर काय होईल?

- Advertisment -

Manini