घरमहाराष्ट्रCabinet Meeting : मुलींच्या सक्षमीकरणासाठी मंत्रिमंडळ सरसावले; विविध योजनांची केली घोषणा

Cabinet Meeting : मुलींच्या सक्षमीकरणासाठी मंत्रिमंडळ सरसावले; विविध योजनांची केली घोषणा

Subscribe

गतीमान सरकार म्हणून संबोधल्या जाणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली.

मुंबई : राज्यातील महिला-मुलींच्या सक्षमीकरणासाठी शिंदे सरकारने मंगळवारी (10 ऑक्टोबर) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध निर्णय घेतले आहेत. तर मुलींना लखपती करण्यासाठी लेक लाडकी योजनेची घोषणा करण्यात आली आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची उपस्थिती होती. (Cabinet Meeting Cabinet convenes for empowerment of girls Various schemes announced)

गतीमान सरकार म्हणून संबोधल्या जाणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यावेळी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.

- Advertisement -

हेही वाचा : BHUSHAN PATIL : ड्रग्ज तस्कर ललित पाटीलच्या भावाला अटक; पुणे पोलिसांकडून कारवाई

राज्यातील मुलींना करणार लखपती

मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील महिला, मुलींना सक्षम करण्यासाठी निर्णय घेण्यात आला आहे. तसेच फलटण ते पंढरपूर नवीन ब्रॉडगेज रेल्वेमार्ग आता रेल्वे मंत्रालयातर्फे पूर्ण करणार असल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली.

- Advertisement -

हेही वाचा : कोल्हापूर : अंबाबाई मंदिर परिसरात गोंधळ; पालिका अतिक्रमणविरोधी विभाग आणि दुकानदारांमध्ये खडाजंगी

मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठक निर्णय

  • महिला बालविकास- राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना, मुलींना करणार लखपती.
  • जलसंपदा विभाग- सार्वजनिक खासगी भागीदारीतून उदंचन जलविद्युत प्रकल्पासाठी धोरण. मोठ्या प्रमाणावर खासगी गुंतवणूक जलविद्युतमध्ये येणार.
  • विधि व न्याय विभाग- सांगली, अहमदनगर जिल्ह्यात जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालये
  • महसूल विभाग- पात्र माजी खंडकरी शेतकऱ्यांना १ एकरापेक्षा कमी जमीन मिळणार.
  • परिवहन विभाग- फलटण ते पंढरपूर नवीन ब्रॉडगेज रेल्वेमार्ग आता रेल्वे मंत्रालयातर्फे पूर्ण करणार
  • महसूल व वन विभाग- भोसला मिलिटरी स्कूलला नागपूर येथे जमीन
  • उच्च व तंत्र शिक्षण- विद्यापीठाच्या नावात औरंगाबाद ऐवजी छत्रपती संभाजीनगर बदल करण्यास मान्यता
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -