Saturday, April 27, 2024
घरमानिनीRelationshipअभ्यासात मागे असणाऱ्या मुलांना असे बनवा topper

अभ्यासात मागे असणाऱ्या मुलांना असे बनवा topper

Subscribe

प्रत्येक मुलाला अभ्यासाची आवड असते असे नाही. त्यांना एखाद्या दुसऱ्याच गोष्टीची आवड असू शकते. परंतु पालकांनी मुलांना नेहमीच शिक्षणाचे महत्व सांगितले पाहिजे. जर तुम्ही शिकलात तरच आयुष्यात उत्तम गोष्टी करु शकता याची समज पालकांनी मुलांना दिली पाहिजे. अभ्यासाचे महत्व समजावून सांगावे. तुमचे मुलं सतत खेळण्याचा हट्ट करत असेल आणि अभ्यासाकडे दुर्लक्ष करत असेल तर त्याच्यावर रागावण्याऐवजी त्याला अभ्यासासाठी कसे तयार करता येईल याचा विचार पालकांनी करावा.(Tips to child make topper in study)

प्रत्येक मुलाची स्मरणशक्ती ही वेगवेगळी असते हे सर्वात प्रथम पालकांनी समजून घ्यावे. एखाद्याला मुलाला एकदा सांगितलं की कळतं तर दुसऱ्याला तिच गोष्ट 2-3 वेळा सांगितल्यानंतर कळते. ज्यामुलांना काही गोष्टी समजून घेण्यास वेळ लागत असेल तर त्यांच्याकडे पालकांनी अधिक लक्ष दिले पाहिजे. अशातच तुमचे मुलं ही अभ्यासात मागे असेल तर त्याला टॉपर बनवण्यासाठी पुढील काही टीप्स तुमच्या जरुर कामी येतील.

- Advertisement -
Tips to child make topper in study
Tips to child make topper in study

-रट्टा मारण्याऐवजी समजून घेण्याची सवय लावा
मुलांना अभ्यासात रट्टा मारण्याऐवजी त्याला ते समजून घेण्याची सवय लावा. कारण सुरुवाती पासूनच तुम्ही मुलाला ही सवय लावली तर जेव्हा तो एकट्यात अभ्यास करेल तेव्हा सुद्धा रट्टा मारण्यापासून दूर राहिल. त्याच्या ज्ञानात ही भर पडत राहिल हे पालकांनी लक्षात ठेवले पाहिजे.

-प्रॅक्टिकली काही गोष्टी करुन दाखवा
जेव्हा तुम्ही मुलाला एखादी गोष्ट समजावून सांगत असाल तर उत्तमच आहे. केवळ पुस्तकी किडा बनवण्याऐवजी त्याला काही गोष्टी प्रॅक्टिकली ही करुन दाखवा. यामुळे त्याचा प्रॅक्टिकल दृष्टीकोन ही विस्तारेल.

- Advertisement -

-घरी जरुर अभ्यास घ्या
जर तुमचे मुलं अभ्यासात मागे असेल म्हणून ट्युशनला पाठवत असाल तर उत्तमच आहे. पण पालकांनी घरी सुद्धा मुलांचा अभ्यास घेतला पाहिजे. जेणेकरुन पालकांना कळेल की, त्याला अभ्यासात किती आवड आहे.

-मुलांसाठी वेळापत्रक बनवा
मुलांच्या अभ्यासाचे एक वेळापत्रक जरुर बनवा. त्या त्याने काय वाचायचे आहे किंवा त्याच्या खाण्यापिण्याची नोंद ही त्या वेळापत्रकात करा. या व्यतिरिक्त त्याला खेळण्यासाठी ही वेळ द्या.

-बुद्धिमत्तेला चालना देणारे गेम खेळा
मुलांच्या बुद्धिमत्तेला चालना देणारे गेम त्यांच्यासोबत जरुर खेळा. यामुळे त्याची बुद्धिमत्ता वाढेल. तसेच त्याला घराबाहेर जाऊन ही खेळण्यास वेळ द्या. (Tips to child make topper in study)

-मुलांचे मित्र व्हा
पालकांनी कधीच मुलांसोबत कठोर वागू नये. यामुळे मुलं तुमच्याशी काही गोष्टी शेअर करताना घाबरतात. अशातच पालकांनी मुलांशी मित्रत्वाचे नाते तयार करावे.

-मुलांना प्रोत्साहन द्या
जर तुमचे मुलं अभ्यासात मागे असेल तर त्याला डेमोटिव्हेट करण्याऐवजी तु हे करु शकतोस असे बोलून त्याला प्रोत्साहन द्या. जेणेकरुन तो मन लावून अभ्यास करण्याचा प्रयत्न करा.


हेही वाचा- Parenting: 1-3 वर्षाच्या मुलांना अशी शिकवा शिस्त

- Advertisment -

Manini