Thursday, September 21, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Health वेळेवर लंच करणे शक्य नसल्यास 'या' टीप्सने सुधारा डाइजेशन

वेळेवर लंच करणे शक्य नसल्यास ‘या’ टीप्सने सुधारा डाइजेशन

Subscribe

हेल्दी राहण्यासाठी डाइजेशन योग्य असणे अत्यंत गरजेचे असते. आपण धावपळीच्या आयुष्यात काही अशा चुका करून बसतो की, त्याचा आपल्या पचनावर परिणाम होतो. ज्यामध्ये ब्रेकफास्ट स्किप करणे, लंच उशिराने करणे अशा गोष्टींचा समावेश आहे. लंच करण्याची योग्य वेळ ही 11-1 दरम्यानची असते. मात्र काही वेळेस लंच करण्यासाठी फार उशिर होतो. खासकरुन अशा लोकांना जे नोकरी करतात. लंच उशिराने केल्यास त्याचा थेट परिणाम डायजेशनवर होतो. जर तुम्ही लंच उशिराने करत असाल तर गॅस, ब्लोटिंग, सुस्ती येणे आणि डोकेदुखी अशा काही समस्या होऊ शकतात.

खरंतर तुम्ही लंच वेळेवर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मात्र एखाद्या कारणास्तव तसे होत नसेल तर पुढील काही टीप्स कामी येतील. जेणेकरुन डाइजेशन सुधारण्यास मदत होईल.

- Advertisement -

11-1 दरम्यान पाणी प्या
एक्सपर्ट्सच्या मते जर तुम्ही 11-1 दरम्यान लंच करू शकत नसाल तर एक ग्लास पाणी जरुर प्या. पाणी प्यायल्याने डाइजेशन सुधारते आणि मेटाबॉलिज्म सुधारते. जर ब्रेकफास्ट लवकर केला असेल आणि लंच करण्यास उशिर होत असल्यास 11-1 दरम्यान पाणी जरुर प्या.

पल्पी फळं खा
जर तुम्ही लंच वेळेवर करत नसाल तर 11-1 दरम्यान पपई, चिकू किंवा केळ्यासारखी पल्पी फळं खाऊ शकता. जर तुमच्याकडे फळं नाही तर खजूर खा. जेणेकरुन लंच करतेवेळी गॅस किंवा ब्लोटिंगची समस्या येणार नाही.

- Advertisement -

लंच नंतर तूप-गुळ खा
11-2 दरम्यान वरील गोष्टी खाल्ल्यानंतर तुम्ही 2-3 वाजता लंच करू शकता. त्यानंतर तूप आणि गुळ खा. एक लहान तुकडा गुळाचा तुपासोबत खा. जेणेकरुन लंच नंतर गॅस आणि ब्लोटिंगची समस्या होणार नाही.


हेही वाचा- लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी घरगुती उपाय

- Advertisment -

Manini