घरमहाराष्ट्रमध्य रेल्वेनंतर हार्बर लाईनच्या 'या' चार रेल्वे स्थानकांचा होणार कायापालट

मध्य रेल्वेनंतर हार्बर लाईनच्या ‘या’ चार रेल्वे स्थानकांचा होणार कायापालट

Subscribe

मुंबई : मध्य आणि पश्चिम रेल्वे पाठोपाठ आता हार्बर लाईवरील चार स्थानकांचे नुतनीकरण करण्यात येणार आहे. यासाठी मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनकडूनला 130 कोटी रुपयांच्या अंदाजे खर्च होणार आहेत. यात जीटीबी नगर, चेंबूर, गोवंडी आणि मानखुर्द या चार स्थानकांचे नुतनीकरण करण्याची योजना आहे. यासाठी 15 ऑक्टोबरपर्यंत निविदा प्रक्रिया पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

या रेल्वे स्थानकात अतिरिक्त फूट ओव्हर ब्रिजेस, स्कायवॉक, एलिव्हेटेड डेक आणि सर्विस इमारती या सुधारण्यात येणार आहेत, असे एमआरव्हीसीचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी माहिती दिली आहे. तसेच जीटीबी नगर रेल्वे स्थानकावर पश्चिम आणि दक्षिण टोकाला पूर्वी प्रवेशद्वारांना जोडणारा डेक बांधण्यात येणार असून जे रोड ओव्हर ब्रिज आणि प्रस्ताविक प्लॅटफॉर्मला जोडेल जाणार आहेत. 275 मीटर लांबीचा आणि 10 मीटर रुंदीचा एक नवीन होम प्लॅटफॉर्म पश्चिमेकडे बांधला जाईल आणि या प्लॅटफॉर्म उत्तरेकडे 75 मीटरने वाढवण्यात येईल आणि यात पार्किंग क्षेत्र स्थापित केले जाईल”, असेही उदासीन यांनी सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा – मध्य आणि हार्बर मार्गावरील ‘या’ रेल्वे स्थानकांचा होणार कायापालट; असणार पंचतारांकित सुविधा

मध्य रेल्वेची ‘या’ स्थानकांचा होणार कायापालट

गेल्या काही दिवसांपूर्वी मध्य रेल्वेच्या घाटकोपर, भांडुप, मुलुंड, डोंबिवली आणि हार्बर मार्गावरील गोवंडी आणि मानखुर्द या रेल्वेस्थानकांचा लवकरच कायापालट करण्याचा निर्णय घेतला आहे. ईशान्य मुंबईचे खासदार मनोज कोटक यांच्या प्रयत्नामुळे या रेल्वे स्थानकांमध्ये पंचतारांकित सोवासुविधा उपलब्ध होणार आहेत. यासाठी मुंबई रेल विकास कॉर्पोरेशन (एमआरव्हीसी) मुंबई अर्बन ट्रान्स्पोर्ट प्रोजेक्ट एमयूटीपी फेज-3ए प्रकल्पांतर्गत कोट्यवधी रूपये खर्च करणार आहे. या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून स्थानकाचे काम ऑक्टोबर महिन्यात सुरू होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -