Wednesday, May 1, 2024
घरमानिनीKitchenKitchen Tips : स्वयंपाक घरात वापरा ‘या’ हटके टिप्स

Kitchen Tips : स्वयंपाक घरात वापरा ‘या’ हटके टिप्स

Subscribe

स्वयंपाक घरात जेवण बनवण्यासोबत काही साध्या-सोप्या टीप्स देखील गरजेच्या असतात. ज्या जेवन करताना खूप उपयोगी येतात. ज्या आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

जेवण बनवताना वापरा ‘या’ टिप्स

How to Wash Fruits and Vegetables Effectively So They're Safe to Eat

- Advertisement -

 

  • डाळिंबीची उसळ शिजत असतानाच जर त्यात थोडेसे दूध घातले तर डाळिंबी अख्ख्या राहतात त्यांचे शिजून मेन होत नाही. तसेच डाळिंबी शिजण्यापूर्वीच जर त्यात गूळ किंवा साखर घातली तर त्या दाठरतात व चांगल्या लागत नाहीत.
  • सॅलेड करायच्या आधी भाज्या बर्फाच्या पाण्यात टाकाव्यात, त्यामुळे त्या टवटवीत दिसतात.
  • साबुदाण्याची खिचडी करताना त्याच्यावर दुधाचा किंवा ताक शिंपडावे. आवडत असल्यास काकडी बारीक चिरून घालावी. खिचडी मोकळी, नरम, चवदार होते.
  • वरण शिजवताना तुरीच्या डाळीत चिमूटभर हिंग, हळद, व चमचाभर साजूक तूप घालावे. यामुळे डाळ नरम शिजते व स्वादही छान येतो.

Do you need to wash fruits and vegetables?

- Advertisement -
  • पालेभाज्या, कोथिंबीर नीट निवडून पेपरमध्ये गुंडाळून मग प्लास्टिकच्या डब्यात किंवा कॅरी बॅगेमध्ये घालून फ्रिजमध्ये ठेवाव्यात. प्रत्येक वेळी बाहेर काढल्यानंतर डबा पुसून कोरडा करावा. यामुळे भाज्या बरेच दिवस ताज्या राहतात.
  • भाजलेल्या दाण्याची साल काढू नये. सालासकटच कूट करावे. सालात एक प्रकारचे अ‍ॅन्टीऑक्सिडन्ट्स असतात, जे हृदयासाठी चांगले असतात.
  • वालाची (बिरडं/डाळिंब्या/पावटे) उसळ/भाजी करताना डाळिंब्या पूर्ण व नीट शिजल्यावरच उसळीत मीठ आणि गूळ (हवा असल्यास) टाकावा अन्यथा त्या दाठरतात.

हेही वाचा :

दूधाचा ग्लास किंवा बॉटलमधून विचित्र वास येत असेल तर करा ‘हा’ उपाय

- Advertisment -

Manini