घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरमराठा आंदोलकांच्या आक्रमक पावित्र्यानंतर छत्रपती संभाजीनगरमधून सुटणाऱ्या एसटी बसेस रद्द

मराठा आंदोलकांच्या आक्रमक पावित्र्यानंतर छत्रपती संभाजीनगरमधून सुटणाऱ्या एसटी बसेस रद्द

Subscribe

छत्रपती संभाजीनगर : मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावे या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा बुधवारी (25 ऑक्टोबर) आमरण उपोषणाला बसलेले आहे. त्यानंतर मराठा समाजही आक्रमक झाला असून त्यांनी राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी केली आहे. एवढेच नाही तर राज्यभरात मराठा समाजाकडून आंदोलन सुरू आहे. मात्र काही ठिकामी त्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे पाहायला मिळत आहे. नांदेड, बीड जिल्ह्यातील एसटी बसवर दगडफेक करण्यात आली असून काही ठिकाणी बस पेटवण्यात आली आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बस स्थानकातून काही बस रद्द करण्यात आल्या आहे. (ST buses departing from Chhatrapati Sambhajinagar canceled after Maratha protestors aggression)

हेही वाचा – “ते म्हणत असतील तर…”, मनोज जरांगेंना भेटण्याबाबत सरकारकडून देण्यात आले स्पष्टीकरण

- Advertisement -

मराठा आंदोलकांच्या आक्रमक पावित्र्यानंतर छत्रपती संभाजीनगर शहरातील मुख्य बस स्थानकातून कन्नड, पैठण, बीड आणि जालना येथे जाणाऱ्या सर्व बसेस रद्द करण्यात आल्या आहे. तर, सिल्लोड आणि पुणे या महामार्गावरील बसेस सध्या सुरू असल्याची माहिती एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. याशिवाय सर्व मार्गावरील स्थानिक पोलिसांशी आम्ही संपर्क करत असून, त्यांच्या सूचनेनुसार बस सोडण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती देखील एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

छत्रपती संभाजीनगर ते पैठण मार्गावर बसेस बंद

आंदोलनाला हिंसक वळण आल्यामुळे छत्रपती संभाजीनगर ते पैठण मार्गावरील बसेस सध्या बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पैठण डेपोमध्ये सध्या सर्व बसेस जागेवर उभ्या आहेत. एवढेच नाही तर सर्व बसेस पुढील आदेश येईपर्यंत बाहेर काढू नयेत, अशा सूचना देखील एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – केंद्राशी चर्चा करून जरांगे पाटलांच्या उपोषणाबाबत ताबडतोब निर्णय घ्यावा, अन्यथा…; राऊतांचा इशारा

बीडमध्ये बस पेटवली तर, नांदेडमध्ये दगडफेक

मराठा आंदोलकांनी शनिवारी (28 ऑक्टोबर) रात्री धुळे- सोलापूर महामार्गावर बीडच्या महालक्ष्मी चौकामध्ये टायर जाळून महामार्ग अडवण्यात आला होता. त्यानंतर अज्ञात व्यक्तींकडून आहेर वडगाव फाट्यावर बीड-कोल्हापूर ही स्लीपर एसटी बस जाळण्यात आली होती. त्याचबरोबर एका बसवर दगडफेक करत जाळण्याचा प्रयत्न देखील केला होता. त्यानंतर आज सकाळी पुन्हा एकदा बीडपासून काही अंतरावर असलेल्या चराटा फाट्याजवळ बीड-कल्याण गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. तर दुसऱ्या घटनेत नांदेडच्या माहूर तालुक्यातील आष्टा फाटा याठिकाणी अज्ञात मंडळीने एसटी बसेसवर दगडफेक केल्यामुळे काचा फुटून मोठे नुकसान झाले आहे. या प्रकरणी पोलीस दगडफेक करणाऱ्या लोकांचा शोध घेत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -