Saturday, April 27, 2024
घरमानिनीअस्सल घरगुती मालवणी कोंबडी मटण, 'ही' पद्धत करा ट्राय

अस्सल घरगुती मालवणी कोंबडी मटण, ‘ही’ पद्धत करा ट्राय

Subscribe

घरच्या घरी अस्सल मालवणी पद्धतीचा मटण बनवणे अगदी सोपे आहे. मालवणी कोंबडी मटण बनविण्यासाठी या साहित्यांचा वापर करा. आणि झटकीपट सोप्या साहित्यांचा वापर करून झणझणीत टेस्टी असे मालवणी कोंबडी मटण बनवा.

malvani chicken curry || konkani chicken - YouTube

- Advertisement -

साहित्य-

  • 1 अख्या कोंबडीचे लहान लहान तुकडे,
  • 4-5 बारीक चिरलेले कांदे,
  • 2 बटाटाच्या फोडी,
  • 1 ते दीड वाटी ओले किंवा सुके खोबरे,
  • 1/2 वाटी काजू,
  • वाटलेले आले लसूण,
  • तूप,तेल हळद,तिखट,गरम मसाला
  • 4-5 लवंगा,
  • 2-3 दालचिनीचे तुकडे,
  • 2 वेलची,
  • छोटा जाफळाचा तुकडा,
  • 1 चमचा धने,
  • 1/2 चमचा साधे जिरे,
  • 4 लाल मिरच्या,
  • 1 हिरवी मिरची,
  • 2 लसूण पाकळ्या,
  • आल्याचा लहानसा तुकडा

Kombdi Masala Curry Recipe | olivemagazine

- Advertisement -

कृती-

कोंबडीच्या तुकड्यांना आले-लसणीची पेस्ट आणि चिरलेल्या कांद्यांपैकी 3/4 कांदा व हळ्द लावून ठेवणे.

1/2 वाटी तेलात किंवा तुपात उरलेला कांदा फोडणीला घालून चांगला परतून घेणे. नंतर कोंबडीचे तुकडे घालून शिजवणे.

वरील सर्व गरम मसाला थोड्याश्या तुपात मंद आचेवर एक एक करून भाजून घेणे.

कांदा व मसाला एकत्र वाटून घ्यावा. कोंबडी शिजत अली की बटाटयाचे तुकडे व वाटलेला मसाला घालणे.

चवीनुसार मीठ, 1 चमचा तिखट हे सर्व मिश्रण ढवळून घेणे.


हेही वाचा :-

घरच्या घरी बनवा ‘लेमन चिकन’

- Advertisment -

Manini