Monday, April 29, 2024
घरमानिनीHealthमेहंदी केवळ सौंदर्यासाठीच नव्हे, आरोग्यासाठी देखील आहे फायदेशीर

मेहंदी केवळ सौंदर्यासाठीच नव्हे, आरोग्यासाठी देखील आहे फायदेशीर

Subscribe

प्रत्येक फंक्शनसाठी महिला आवडीने हातावर मेहंदी काढतात. खरंतर हातावर मेहंदी काढणे शुभ मानले जाते. सणावाराच्या दिवसात नटण्या-सजण्याबरोबर मेंदीचा वापर स्त्रिया आवर्जून करतात. मेंदीच्या पानातील रंगामुळे तसेच त्यातून येणाऱ्या सुगंधामुळे मेंदीला अधिक महत्व प्राप्त झाले आहे. परंतु मेहंदी केवळ सौंदर्यासाठीच नव्हे तर आरोग्यासाठी देखील तितकीच फायदेशीर आहे.

मेहंदी आरोग्यासाठी फायदेशीर

How to Choose the Right Henna Powder - Henna for Hair and Skin – The Henna Guys

- Advertisement -

 

  • मेंदीमध्ये अनेक औषधी गुणतत्त्वे आहेत. मेंदीच्या खोडाच्या सालीच्या अर्कामुळे त्वचारोग, पांढरे कोड आदी विकार दूर होतात.
  • मेंदीच्या सालीच्या काढ्याने मुतखडा दूर करता येतो. मेंदीच्या पानांचा लेप गळवे, जखमा, खरचटणे, भाजणे किंवा त्वचेचा दाह इत्यादींवर बाह्य उपचार म्हणून उपयुक्त ठरतो.
  • मेंदीच्या पानांमध्ये वांतिकारक आणि कफोत्सारक गुणधर्म आहे. घसादुखी असल्यास गुळण्या करताना पाण्यात मेंदीची पाने घातली जातात.

Herbal Mehandi Powder

- Advertisement -
  • पायांची आग कमी करण्यासाठी, शरीरातील अतिरिक्त ऊर्जा उत्सर्जित करण्यासाठी, डोकेदुखी थांबवण्यासाठी मेंदी डोक्याला किंवा पायाला लावतात.
  • मेंदीच्या पानांचा, सालींचा अर्क क्षयविकार दूर करण्यासाठी उपयोगात येतो. मेंदीच्या फुलातून टीरोझसारखे सुगंधी द्रव्य प्राप्त होते.

 


हेही वाचा : जाम खाण्याचे आरोग्यदायी फायदे

- Advertisment -

Manini