घरमहाराष्ट्रमीरा बोरवणकरांच्या आरोपांनंतर पृथ्वीराज चव्हाणांनी 'त्या' प्रकरणी व्यक्त केली खंत

मीरा बोरवणकरांच्या आरोपांनंतर पृथ्वीराज चव्हाणांनी ‘त्या’ प्रकरणी व्यक्त केली खंत

Subscribe

पत्रकार परिषदेत बोरवणकर यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचेही नाव घेतले आहे. ज्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. परंतु या प्रकरणाबाबत पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून स्पष्टीकरण देण्यात आले असून त्यांनी त्यावेळी एका गोष्टीबाबत खंत व्यक्त केली आहे.

मुंबई : माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांच्या ‘मॅडम कमिशनर’ या पुस्तकामुळे सध्या राज्यातील राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे. येरवडा कारागृहाच्या जमीन लिलाव प्रकरणात मीरा बोरवणकर यांनी राज्याचे आजचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. अजित पवार यांनीच येरवडा कारागृहाच्या जमीन लिलावाचा आग्रह धरला होता आणि ती जमीन तेव्हा त्यांनी 2जी घोटाळ्यातील सीबीआयने अटक केलेला बिल्डर शाहिद बालवा याला देण्यास सांगितली होती, असे मीरा बोरवणकर यांच्याकडून सोमवारी (ता. 16 ऑक्टोबर) झालेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेत बोरवणकर यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचेही नाव घेतले आहे. ज्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. परंतु या प्रकरणाबाबत पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून स्पष्टीकरण देण्यात आले असून त्यांनी त्यावेळी एका गोष्टीबाबत खंत व्यक्त केली आहे. (After Meera Borwankar’s allegations, Prithviraj Chavan expressed regret in ‘that’ case)

हेही वाचा – ड्रग्ज माफिया ललित पाटील पळून जाण्यात भाजप आमदाराचा हात; धंगेकरांचा गौप्यस्फोट

- Advertisement -

मीरा बोरवणकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते की, माझ्या आयुक्तपदाचा कार्यकाळ दोन वर्षांचा होता. मात्र मला आघाडीधर्म पाळावा लागेल, असे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले होते. मीरा बोरवणकर यांच्या खुलाश्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून याबाबतचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. या प्रकरणाबाबत बोलताना ते म्हणाले की, जमिनीच्या व्यवहाराप्रकरणात माझा काही संबंध नाही. मी त्यानंतर मुख्यमंत्री बनलो होतो. त्याबरोबरच त्यांनी बदलीच्या संदर्भात माझे नाव घेतले आहे. मात्र, प्रशासकीय कामानिमित्त त्यांनी मला बदलीची विनंती केली होती. मात्र, मला आता याबाबत फार काही आठवत नाही. काय लिहिलंय ते पाहण्यासाठी मला ते पुस्तक वाचावे लागेल.

यासोबतच त्यावेळी दोन अधिकाऱ्यांच्या दबावामुळे बदल्या कराव्या लागल्या असे सांगत त्यांनी त्यावेळी केलेल्या बदल्यांबाबत खंत व्यक्त केली. याबाबत बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, सरकार हे रुलबेस्ड असले पाहिजे, म्हणजे तुम्हाला जे पाहिले ते करा. पण, सरकारने नियमांना धरुनच काम केले पाहिजे. कारण, नियम बनवणारे सरकार असते. म्हणून नियमाने वागले पाहिजे. अनेकदा असे होते, हा अधिकारी चुकीचे वागतोय, तो नियमावर बोट ठेऊन काम करतोय. पण हे नियम तुम्हीच केलेले आहेत, अधिकाऱ्यांनी केलेले नाहीत. तुम्ही नियम करुन हे नियम तू पाळ, असे अधिकाऱ्यांना सांगितले आहे.

- Advertisement -

पण अनेक अधिकारी कडक नियम पाळायला लागले की आपण त्यांच्या बदल्या करतो, असे सांगत ते पुढे म्हणाले की, दोन अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यासाठी माझ्यावर खूप राजकीय दबाव होता. मला ते पटत नव्हते, पण शेवटी खूपच राजकीय दबाव असल्याने ते स्वीकारावे लागले होते. मी त्या अधिकाऱ्यांची नावे घेणार नाही. पण, ते अधिकारी चांगले काम करत होते, पुण्यात काम करत होते. दुर्दैवाने मला त्यांच्यावर अन्याय करावा लागला, अशी कबुली पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून देण्यात आली आहे. पृथ्वीराज चव्हाण हे 10 नोव्हेंबर 2010 ते 28 सप्टेंबर 2014 या कालावधीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि त्याचवेळी मीरा बोरवणकर पुण्यात कार्यरत होत्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -