घरपालघरमोबाईलमध्ये गेम खेळताना लिंक ओपन, पैसे गेले...मुलाचे टोकाचे पाऊल

मोबाईलमध्ये गेम खेळताना लिंक ओपन, पैसे गेले…मुलाचे टोकाचे पाऊल

Subscribe

बुधवारी रात्री गेम खेळत असताना मोबाईल एक लिंक आली. गौरवने चुकून ती लिंक ओपन केली असता सायबर चोरट्याने मोबाईल हॅक केला.

वसईः आईच्या मोबाईलमध्ये गेम खेळत असताना चुकून लिंक ओपन होऊन सायबर झाल्यानंतर सायबर भामट्याने वडिलांच्या बँक खात्यातील दोन लाख रुपये लंपास केले. पैसे गेल्याने वडिल संतापतील याभितीपोटी नालासोपार्‍यातील एका १८ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना उजेडात आली आहे.गौरव रॉय (१८) असे त्याचे नाव आहे. धानिवबाग येथील गौरव अकरावीत शिकत होता. सुट्टी सुरु असल्याने गौरवने आईचा मोबाईल गेम खेळण्यासाठी घेतला होता. बुधवारी रात्री गेम खेळत असताना मोबाईल एक लिंक आली. गौरवने चुकून ती लिंक ओपन केली असता सायबर चोरट्याने मोबाईल हॅक केला.

मोबाईल नंबर बँक खात्याशी लिंक असल्याने सायबर भामट्याने त्यात असलेल्या गौरवच्या वडिलांच्या बँक खात्यातील २ लाख रुपये लंपास केले.या प्रकारामुळे गौरव खूप घाबरला. त्याच्याकडून नकळत चूक घडली होती. वडिलांना ही गोष्ट समजल्यावर ते रागावतील, मारतील या भीतीपोटी गौरवने दुपारी ३ च्या सुमारास त्याने किटकनाषक प्राशन केले. काही वेळाने त्याच्या छातीत दुखू लागले. उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरु असताना गौरवचा मृत्यू झाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -