Saturday, April 27, 2024
घरमानिनीKitchenRecipe : सोप्या पद्धतीने बनवा नाचणीचे अप्पे

Recipe : सोप्या पद्धतीने बनवा नाचणीचे अप्पे

Subscribe

नाचणीचा वापर आपण रोजच्या आहारात फार कमी प्रमाणात करतो. परंतु नाचणीमध्ये भरपूर कॅल्शियम, पोटॅशियम, लोह आणि व्हिटॅमिन्स भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे 3-4 दिवसातून एकदा तरी नाचणी युक्त पदार्थांचे सेवन करायला हवे. आज आम्ही तुम्हा नाचणीचे आप्पे कसे तयार करावे हे सांगणार आहोत.

साहित्य :

  • उडीद डाळ 1 वाटी ( 4-5 तास भिजलेली)
  • नाचणी पीठ 1 वाटी
  • बेसन 1 वाटी
  • 3-4 हिरव्या मिरच्या
  • कोथिंबीर
  • लसूण पाकळ्या
  • मीठ चवीनुसार

कृती :

- Advertisement -

 

  • सर्वप्रथम 4-5 तास भिजवलेली उडीद डाळ मिक्सरमध्ये वाटून घ्या.
  • त्यानंतर त्यात नाचणी पीठ, बेसन पीठ घालून सगळं फेटून घ्या. त्यानंतर त्यात मीठ घालून रात्रभर पीठ आंबववायला ठेवा.
  • दुसऱ्या दिवशी त्या पीठात मिरची-लसूण-कोथिंबीरचे वाटण मिक्स करा.
  • आप्पे पात्राच्या आतल्या बाजूस तेल लावून आप्पे घाला आणि ते दोन्ही बाजूने छान भाजून घ्या.
  • आता गरमागरम आप्पे खोबऱ्याच्या चटणीसोबत सर्वांना सर्व्ह करा.

हेही वाचा :

Recipe: गावरान पद्धतीची मासवडी

- Advertisment -

Manini