घर महाराष्ट्र पाकिस्तानी मुलगी विराटची स्तुती करतेय, पण आपल्याकडे... जितेंद्र आव्हाडांच ट्वीट आणि यूजर्सच्या...

पाकिस्तानी मुलगी विराटची स्तुती करतेय, पण आपल्याकडे… जितेंद्र आव्हाडांच ट्वीट आणि यूजर्सच्या कमेंट्स

Subscribe

भारत-पाकिस्तान सामना शनिवारी, 2 सप्टेंबरला झाला. यासाठी जगभरातून अनेक क्रिकेटप्रेमी उपस्थित होते. यावेळचा एका महिला क्रिकेटप्रमीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. त्यावरच आता राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट केलंय परंतु त्यांना आलेल्या कॉमेंट्सनंही लक्ष वेधलं आहे.

आशिया चषक 2023 स्पर्धा सध्या सुरू आहे. या स्पर्धेत सर्वाधिक कोणत्या सामन्याची चर्चा होते तर तो आहे भारत विरुद्ध पाकिस्तान. या सामन्यासाठी क्रिकेटप्रेमी खूप प्रतीक्षा करत असतात. तोच भारत-पाकिस्तान सामना शनिवारी, 2 सप्टेंबरला झाला. यासाठी जगभरातून अनेक क्रिकेटप्रेमी उपस्थित होते. यावेळचा एका महिला क्रिकेटप्रमीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. त्यावरच आता राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट केलंय परंतु त्यांना आलेल्या कॉमेंट्सनंही लक्ष वेधलं आहे. (Jitendra Awhad tweet on Pakistani Girl viral Video who talking about Virat Kohli users commented on It)

नेमकं प्रकरण काय?

बहुचर्चित असा भारत-पाकिस्तान सामना, 2 सप्टेंबरला झाला. परंतु पाकिस्तानला फलंदाजी करण्याची संधी मिळालीच नाही. पावसामुळे हा सामना रद्द करावा लागला. दोन्ही संघांना 1-1 गुण देण्यात आले. पाकिस्तानी संघानं 3 गुणांसह सुपर-4 मध्ये प्रवेश केला. तर, भारतीय संघाच्या खात्यात 1 गुण आहे. सामन्यानंतर नेहमीप्रमाणे चाहत्यांनी आपल्या आवडत्या खेळाडूवर प्रेमाचा वर्षाव केला. एका पाकिस्तानी फॅनने भारतीय दिग्गज खेळाडू विराट कोहलीच कौतुक केलं. त्यावेळी तिला एका पाकिस्तानी नागरिकाने टोकलं. त्यावेळी तिने शेजाऱ्यांवर प्रेम करणं, चुकीचं तर नाही ना, असं म्हटलं आणि त्यामुळे तिचं सर्वत्र कौतुक होत आहे. हाच व्हिडीओ ट्वीट करत जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे.

- Advertisement -

जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत लिहिलं की, ही पाकिस्तानी मुलगी मनमोकळेपणाने विराटची स्तुती करतेय. आपल्याकडे कुणी बाबर आझमचं कौतुक केलं तर त्याची कबर खोदतील. त्यांच्या या ट्वीटवर आता अनेक कमेंट्स येत आहेत.

- Advertisement -

एका मयुर वैद्य नावाच्या युजरनं म्हटलं की, काही म्हणा तुमच्या मतदारसंघाला खुश करेल असं मटेरियल मस्त शोधून काढता. धंदा हैं पर गंदा है. काय करणार. जनाची आणि मनाची, याचा तुमच्याशी काय संमंद? जैसा गुरू, तैसा चेला.

तर एका अन्य युजरने लिहिलंय की, विराट कोहलीची ब्रँड किंमत माहिती आहे का ? त्याची प्रसिद्धी आणि हो तो भारताचा नागरिक आहे. कुठली स्पर्धा कुठेही करणार का? हा तुमचा मुंब्रा मधून कुणी असे करू शकते, यात तिळमात्र शंका नाही, असं म्हणत त्यांना सुनावलं आहे.

(हेही वाचा: Jalna Lathi Charge : ज्यांनी मराठा समाजाचा गळा घोटला ते…; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर हल्लाबोल )

तर एकानं तर म्हटलंय की कुछ भी, तुम्ही औरंग्याची स्तुती करता तरी निवांत आहात…

जितेंद्र आव्हाड यांनी उपरोधिक ट्वीट केलं तर त्यावर आता युजर्सनेही त्यांना खडे बोल सुनावले आहेत.

- Advertisment -