Saturday, April 27, 2024
घरमानिनीRecipe : गव्हाच्या पिठापासून तयार करा चटपटीत चिप्स

Recipe : गव्हाच्या पिठापासून तयार करा चटपटीत चिप्स

Subscribe

अलीकडच्या लहान मुलांना बाजारातील चिप्स, नाचो चिप्स यांसारखे चटपटीत पदार्थ खायला खूप आवडत. अशावेळी वारंवार बाजारातील पदार्थांचे सेवन करण्याऐवजी तुम्ही घरच्या घरी चटपटीत आणि पौष्टिक अशा गव्हाच्या पिठापासून नोचो चिप्स तयार करू शकता.

साहित्य :

- Advertisement -
  • 1 कप गव्हाचे पीठ
  • 1/4 कप बेसन
  • 1/2 चमचा हळद
  • 1/2 चमचा ओवा
  • चवीनुसार मीठ
  • तेल आवश्यकतेनुसार

कृती :

Crispy & spicy Wheat flour chips - 2020 - Diwali special snacks recipe at home - YouTube

  • सर्वप्रथम नाचो चिप्स बनवण्यासाठी एका भांड्यात गव्हाचे पीठ, बेसन, 1 चमचा तेल, हळद, मीठ एकत्र करून घ्या.
  • आता त्यात थोडे पाणी घालून पीठ घट्ट मळून घ्या आणि ते पीठ 20-25 मिनिटे बाजूला ठेवा.
  • आता पिठाचे मोठे गोळे बनवा आणि पीठ चौकोनी आकारात लाटून घ्या.
  • चाकूच्या मदतीने पीठ चौकोनी आकारात कापून घ्या आणि नंतर त्रिकोणी आकारात कापून घ्या.
  • याचप्रमाणे सर्व गोळे लाटून कापून घ्या.
  • आता कढईत तेल गरम करण्यासाठी मध्यम आचेवर ठेवा.
  • तेल गरम होताच त्यात नाचो चिप्स घालून ते सोनेरी होईपर्यंत तळा.
  • त्याचप्रमाणे सर्व नाचो चिप्स तळून प्लेटमध्ये काढा.
  • त्यांना टोमॅटो सॉस किंवा चटणी बरोबर सर्व्ह करा.

हेही वाचा :

Food Tips : भेंडीची भाजी चिकट न होण्यासाठी वापरा ‘या’ टिप्स

- Advertisment -

Manini