घरमहाराष्ट्रLoksabha 2024: शिर्डीत उद्धव ठाकरेंना धक्का; भाऊसाहेब कांबळेंचा शिंदे गटात प्रवेश

Loksabha 2024: शिर्डीत उद्धव ठाकरेंना धक्का; भाऊसाहेब कांबळेंचा शिंदे गटात प्रवेश

Subscribe

शिर्डी: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. महाविकास आघाडीत जागावाटपावरून तिढा कायम असतानाच उद्धव ठाकरे यांना शिर्डीमध्ये मोठा धक्का बसला आहे. श्रीरामपुरचे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत गुरुवारी रात्री उशीरा मुंबईत हा प्रवेश सोहळा पार पडला. (Loksabha 2024 Shock for Uddhav Thackeray in Shirdi Bhausaheb Kamble s entry into the Shinde group)

भाऊसाहेब विरुद्ध भाऊसाहेब सामना रंगणार?

भाऊसाहेब कांबळे यांनी 2019 मध्ये काँग्रेस पक्षाकडून लोकसभेची निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर कांबळे यांनी शिवसेनेत प्रवेश करत श्रीरामपूर विधानसभेचं तिकीट मिळवलं होतं. मात्र, विधानसभा निवडणुकीतही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.

- Advertisement -

आगामी लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाकडून आपल्याला उमेदवारी मिळेल, अशी आशा भाऊसाहेब कांबळे यांना होती. मात्र, उद्धव ठाकरे यांनी भाऊसाहेब वाकचौरे यांना पुन्हा पक्षात घेतल्याने कांबळे नाराज झाले होते. ते लवकरच शिंदे गटात प्रवेश करतील अशा चर्चा रंगल्या होत्या.

गुरुवारी कांबळे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह थेट मुंबई गाठली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यानंतर अधिकृतपणे त्यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. ऐन लोकसभा निवडणूक तोंडावर असताना, माजी आमदाराने शिंदे गटात प्रवेश केल्याने शिर्डीत ठाकरे गटाचं टेन्शन वाढलं आहे. तर जर का शिंदे गटाने भाऊसाहेब कांबळे यांना उमेदवारी दिली तर शिर्डीत भाऊसाहेब विरुद्ध भाऊसाहेब अशी लढत पाहायला मिळणार आहे.

- Advertisement -

तर दुसरीकडे मनसेही शिर्डीतून बाळा नांदगावकर यांना उमेदवारी देण्याचा विचार करत आहे. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनीही शिर्डीतून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसंच, काँग्रेस आणि भाजपाही या जागेवर दावा करत आहेत. त्यामुळे दिवसागणिक शिर्डी लोकसभेचा तिढा वाढतच चालला आहे.

(हेही वाचा: VBA : वंचितला हवे रोड रोलर, गॅस सिलिंडर किंवा शिट्टी; आघाडीतील प्रवेशावर प्रकाश आंबेडकरांचे नो कॉमेंट्स)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -