Thursday, December 7, 2023
घरमानिनीHealthग्रीन-टी आणि ब्लॅक-टीपेक्षा 'रेड-टी' देखील आहे फायदेशीर

ग्रीन-टी आणि ब्लॅक-टीपेक्षा ‘रेड-टी’ देखील आहे फायदेशीर

Subscribe

ग्रीन टी आणि ब्लॅक टी सोबतच हा अनोखा 'रेड टी' सुद्धा तुम्हाला फिट राहण्यास मदत करते.

फिट राहण्यासाठी आपण सहसा ‘ग्रीन टी’ किंवा ‘ब्लॅक टी’ पितात. मात्र, फिटनेसवर भर देणाऱ्या फार कमी लोकांना ‘रेड टी’ बद्दल ठाऊक असेल. रेड टी आपल्या शरीरासाठी खूपच लाभदायक असतो. आज आम्ही तुम्हाला या स्पेशल चहाविषयी माहिती देणार आहोत. चवीला चांगला असलेला या लाल चहाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. लाल रंग असल्यामुळे रेड टीला ‘रुबी’ टी देखील म्हटलं जातं. नेमकं का म्हणतात या चहाला ‘रेड टी’? आणि काय आहेत या रेड टीचे आरोग्यदायी फायदे? जाणून घेऊया.

रेड टी कसा बनवावा?

रेड टी हा डाळिंबाच्या दाण्यांपासून बनवला जात असल्यामुळे साहाजिकच त्याचा रंग लाल असतो. रेड टी बनवण्याची पद्धत अगदी सोपी आहे. रेड टी बनवायचा असल्यास सर्वप्रथम 3 कप डाळिंबाचे दाणे घ्या. डाळिंबाचे दाणे आणि एक चमचा मध एकत्र करुन मिक्सरमधून त्याचं मिश्रण बनवून घ्या. एखाद्या बरणीमध्ये किंवा बाटलीमध्ये तुम्ही हे मिश्रण भरुन ठेवू शकता, जेणेकरुन तुम्हाला त्याचा कधीही वापर करता येऊ शकतो. रेड टी बनवतेवेळी 2 ते 3 कप पाण्यामध्ये साधारण पाव कप मिश्रण घाला आणि उकळवा. तुमचा रेड टी तयार.

- Advertisement -

रेडी टी पिण्याचे फायदे

Pomegranate tea (Seoklyu-cha) recipe by Maangchi

  • रेड टी पिण्याने तुमची पचनक्रिया सुधारते. तसेच पोटाच्या विकारापासून सुटका मिळते. मुळातच डाळिंबामध्ये असलेले गुणधर्म तुमची पचनक्रिया सुधारण्यासाठी मदत करतात.
  • यामध्ये मुबलक प्रमाणात असलेले अँटीऑक्सिडंट तुमच्या ह्रदयाचे स्वास्थ्य चांगलं ठेवण्यास मदत करतात. यामुळे हार्टशी निगडीत विकारांना आळा बसतो.
  • शरीरातील अतिरिक्त चरबी आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी रेड टी खूपच फायदेशीर ठरतो.
  • सकाळी अर्धा किंवा एक कप रेड टी प्यायल्यास तुम्हाला दिवसभर ताजतवानं वाटतं.

मात्र, या बहुगुणी लाल चहाचे सेवन सुरु करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला जरुर घ्यावा. याशिवाय रेड टी पिणं गरोदर महिलांसाठी चांगलं नसल्याचं तज्ज्ञ सांगतात. तसंच ज्या महिला ब्रेस्ट फिडींग करत आहेत, त्यांनीही रेड टी पिणं टाळावं.

- Advertisement -

 

 


हेही वाचा :

आहारात काळ्या मिरीचा वापर ठरेल आरोग्यकारी

 

- Advertisment -

Manini