घरताज्या घडामोडीमुसळधार पावसाने नागपूरला धुतले, अनेक भागात पाणीच पाणी; फडणवीसांनीही घेतली दखल

मुसळधार पावसाने नागपूरला धुतले, अनेक भागात पाणीच पाणी; फडणवीसांनीही घेतली दखल

Subscribe

हवामान विभागाकडून मराठवाड्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्यानुसार विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. नागपूरात झालेल्या मुसळधार पावसामुळे नागलवाडी, अंबाझरी कार्पोरेशन कॉलोनी मधील अनेक घरात पाणी शिरले आहे.

नागपूरात मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. सतत कोसळत असलेल्या पावसामुळे नागपूरच्या अनेक सखल भागांत पाणी साचलं आहे. नागपुरात रात्री विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला असून एका रात्रीत 106 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. (Heavy Rainfall Water Logging In Nagpur)

हवामान विभागाकडून मराठवाड्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्यानुसार विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. नागपूरात झालेल्या मुसळधार पावसामुळे नागलवाडी, अंबाझरी कार्पोरेशन कॉलोनी मधील अनेक घरात पाणी शिरले आहे.

- Advertisement -

सद्यस्थितीत नागपूरात पावसाची संततधारा कायम आहे. हवामान विभागाकडून नागपुरात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता. त्यानुसार मुसळधार पावसाने हजेरी लावली. शुक्रवारी दिवसभर नागपूरमध्ये पाऊस झाला. सायंकाळनंतर या पावसाची तीव्रता अधिकच वाढल्याने अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाला.

नागपूरमध्ये गेल्या २४ तासांत विक्रमी पावसाची नोंद झाली असून अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याचे पाहायला मिळाले. नागपुरात कोसळत असलेल्या पावसाचा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आढावा घेतला. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली आहे.

- Advertisement -

नागपुरात काल रात्री मुसळधार पावसामुळे अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाल्याने काही भागात पाणी शिरले आहे. अवघ्या 4 तासात 100 मिमीपेक्षा अधिक पाऊस झाल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी मला दिली, असे फडणवीस यांनी सांगितले. तसेच, “नागपूर जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त हे घटनास्थळी पोहोचले असून तातडीने आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. सखल भागात अडकलेल्या नागरिकांना आधी तातडीने मदत करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. एनडीआरएफची एक आणि एसडीआरएफच्या 2 चमू बचाव कार्यात तैनात करण्यात आल्या आहेत. सातत्याने प्रशासनाशी संपर्कात असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत.” असेही फडणवीस म्हणाले.

महापालिकेच्या नागरिकांना इशारा

  • नागपूर शहरात रात्रीपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे आवश्यक कामाशिवाय कुणीही घराबाहेर पडू नये.
  • सततच्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी तसेच रस्त्यांवर पाणी जमा झाले आहे.
  • नदी नाल्यांमध्ये पाणी वाढत असल्यामुळे पूल ओलांडू नये.
  • पाणी कमी झाल्यानंतरच पूल ओलांडावा.
  • अंबाझरी तलावाचे पाणी ओव्हरफ्लो झालेले आहे. त्यामुळे कुठल्याही अफवांकडे लक्ष देऊ नये.
  • तलाव अथवा ओव्हरफ्लोकडे कुणीही जाण्याचा प्रयत्न करू नये.

हेही वाचा – गणेशभक्तांनो रविवारी मुंबईत बिनधास्त फिरा; मध्य -हर्बर रेल्वेवरील मेगाब्लॉक रद्द

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -