घरमहाराष्ट्रभाजपाच्या भक्कम घरात डोकावण्याचा आचरटपणा करण्याऐवजी..., चित्रा वाघांचे संजय राऊतांना प्रत्युत्तर

भाजपाच्या भक्कम घरात डोकावण्याचा आचरटपणा करण्याऐवजी…, चित्रा वाघांचे संजय राऊतांना प्रत्युत्तर

Subscribe

मुंबई : काही लोकांना इंडिया आघाडीची खूप चिंता आहे. इंडिया आघाडीचे कसे होणार? याकडे त्यांचे लक्ष आहे. परंतु इंडिया आघाडीचे उत्तम चालले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्वत:चे घर सांभाळावे, असा सल्ला ठाकरे गटाचा खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. यावर भाजपाच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा – मराठ्यांना डावलून तेली, माळींचा समावेश; शरद पवारांमुळे मराठ्यांचे आरक्षण ओबीसींच्या घशात, नामदेव जाधवांचा आरोप

- Advertisement -

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी इंडिया आघाडीवर टीका करताना, या आघाडीत काही आलबेल नसल्याचे म्हटले आहे. त्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी अमित शहा यांच्यावर जोरदार टीका केली आहे. अमित शहा यांनी आधी स्वत:च्या घरात काय चालले ते पाहावे. इंडिया आघाडी पाच राज्यांत तुमचा दारुण पराभव करेल, असा दावा करतानाच, तुम्ही इंडिया नावाला इतके घाबरले आहात की, इंडियाचे नाव तुम्ही भारत करत आहात, असा टोला खासदार राऊत यांनी लगावला आहे.

मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ, तेलंगणा, मिझोराम प्रत्येक ठिकाणी भाजपा हरणार आहे आणि तुम्ही आम्हाला सांगता की आम्ही काय करायला हवे? त्यापेक्षा स्वत:चे घर आधी सांभाळा, असे राऊत म्हणाले. विधानसभा निवडणुका झाल्या की आम्ही पुन्हा एकत्र बसणार आहोत आणि राष्ट्रीय स्तरावरील सीट शेअरींगचा मुद्दा मार्गी लावणार आहोत, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

हेही वाचा – मोदी, शाहांना ‘इंडिया’ची चिंता करण्याची गरज नाही – संजय राऊत

यावर भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. जनाधारासाठी चाचपडणारे काही पक्ष आता मोठेपणाचा आव आणत INDI अलायन्सचे तुणतुणे वाजवत आहेत. पण, ‘बडा घर, पोकळ वासा’ यापलीकडे तुमची वेगळी अवस्था नाही. त्यात ठाकरे गटाच्या घराचे वासे तर पार मोडकळीला आले आहेत. त्यामुळे भाजपाच्या भक्कम घरात डोकावण्याचा आचरटपणा करण्याऐवजी आपल्या राहत्या घराचे छप्पर कधी कोसळून पडेल, याचा अंदाज घेत चला, असे त्यांनी संजय राऊत यांना सुनावले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -