घरमहाराष्ट्रनागपूर जिल्ह्यातच भाजपचा सुपडा साफ; नाना पटोलेंची टीका, म्हणाले त्यांनी विजयाची यादी...

नागपूर जिल्ह्यातच भाजपचा सुपडा साफ; नाना पटोलेंची टीका, म्हणाले त्यांनी विजयाची यादी जाहीर…

Subscribe

2 हजार 320 ठिकाणची मोजणी सुरू आहे. आतापर्यंत त्यातल्या 589 ग्रामपंचायतींमध्ये काँग्रेसच्या विचारांचे उमेदवार निवडून आले आहेत. 132 ठिकाणी स्थानिक आघाड्यांनी यश मिळवलं आहे. महाविकास आघाडीनं 1 हजार 312 ग्रामपंचायती जिंकल्या आहेत, अशी माहिती नाना पटोलेंनी दिली.

मुंबई: राज्यातील 2 हजार 359 ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत आहे. ग्रामपंचायतींची निवडणूक पक्षाच्या तिकीटावर लढवली जात नाही. त्यामुळे या निकालात आपलीच सरशी झाली, असा दावा राजकीय नेत्यांकडून केला जात आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विदर्भात ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला यश मिळाल्याचा दावा करत विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले आहे. तर, त्याला प्रत्युत्तर देत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपचा बालेकिल्ला म्हटल्या जाणाऱ्या नागपूर जिल्ह्यातच भाजपचा सुपडा साफ झाला असल्याचा, दावा करत भाजपवर जोरदार टीका केली आहे. (Maharashtra Politics In Nagpur district itself BJP s seat is clear Criticism of Nana Patole said he announced the list of victory)

2 हजार 320 ठिकाणची मोजणी सुरू आहे. आतापर्यंत त्यातल्या 589 ग्रामपंचायतींमध्ये काँग्रेसच्या विचारांचे उमेदवार निवडून आले आहेत. 132 ठिकाणी स्थानिक आघाड्यांनी यश मिळवलं आहे. महाविकास आघाडीनं 1 हजार 312 ग्रामपंचायती जिंकल्या आहेत, अशी माहिती नाना पटोलेंनी दिली.

- Advertisement -

यावेळी नाना पटोलेंनी भाजपच्या नंबर वनच्या दाव्याची खिल्ली उडवली. भाजप हा खोटारडा पक्ष आहे. खोटं बोलून ते केंद्रात, राज्यात आले. कुठल्याही पक्षचिन्हाशिवाय ज्या निवडणुका होतात, त्याचे निकाल लागल्यानंतर भाजपवाले खोटा प्रचार करतात. मागच्या काळात बाजार समित्यांच्या निवडणुका झाल्या. त्यात सर्वाधिक जागा काँग्रेसने जिंकल्या. पण भाजपने आपल्या आयटी सेलच्या माध्यमातून भ्रम पसरवला आणि मीडियातील तेच दाखवलं गेलं,याची आठवण पटोले यांनी दिली.

पटोले पुढे म्हणाले की, भाजपने विजयी ग्रामपंचायतींची यादी जाहीर करावी. तेव्हाच कळेल कुठल्या ग्रामपंचायती कोणी जिंकल्या. खोटं बोलतील तर लोक त्यांना मारतील. विशेष म्हणजे ओबीसी आरक्षणाशिवाय या निवडुका झालेल्या आहेत. हिंमत असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लावाव्यात, असं आव्हानं पटोलेंनी दिलं.

- Advertisement -

मोहाडी ग्रामपंचायतीच्या निकालाची आकडेवारीच पटोले यांनी यावेळी जाहीर केली. मोहाडी तालुक्यात काँग्रेस 23, राष्ट्रवादी 7. बीआरएस 7 आणि 7 शरद पवार गट आणि भाजपचे 2 आलेत. ही वस्तुस्थिती आहे आणि भाजप नेमका उलटा प्रचार करत आहे, याकडे नाना पटोले यांनी लक्ष वेधले.

(हेही वाचा: मराठ्यांना डावलून तेली, माळींचा समावेश; शरद पवारांमुळे मराठ्यांचे आरक्षण ओबीसींच्या घशात, नामदेव जाधवांचा आरोप )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -