Thursday, September 28, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Health 'या' 5 कारणामुळे sex drive होऊ शकते painful

‘या’ 5 कारणामुळे sex drive होऊ शकते painful

Subscribe

सर्वसामान्यपणे सेक्स केल्यानंतर आनंदाचा अनुभव येतो असे प्रत्येकजण सांगते. यामुळे तुमचा मेंदू आणि शरिराला ही आराम मिळतो. परंतु काही वेळेस महिलांना पेनिट्रेशनच्या वेळी खुप दुखते. तुम्हाला सुद्धा असे कधी जाणवले आहे का? होय, तर या स्थितीकडे अजिबात दुर्लक्ष करु नका. यामागे काही गंभीर समस्या असू शकतात. याकडे सुरुवातीलाच दुर्लक्ष केले तर हळूहळू समस्या अधिक वाढली जाऊ शकते. (Sex drive painful reasons)

तर पाहूयात अशा काही स्थितीबद्दल ज्या सेक्स दरम्यान महिलांना खुप दुखतेय असा अनुभव देतात. त्याचसोबत यापैकी एखाद्या स्थितीकडे दुर्लक्ष करणे तुम्हाला भारी पडू शकते.

- Advertisement -

सेक्स दरम्यान दुखण्याची सामान्य कारणं

- Advertisement -

-यीस्ट आणि बॅक्टेरियल इंन्फेक्शन
वजाइनल यीस्ट इंन्फेक्शन आणि युरिनरी ट्रॅक्ट इंन्फेक्शच्या कारणास्ताव वजाइनल इन्फ्लेमेशनची समस्या होते, ज्याला वेजिनाइटिस असे म्हटले जाते. नॅशनल लाइब्रेरी ऑफ मेडिसन द्वारे प्रकाशित एका अभ्यासानुसार वजाइनाला आलेल्या सुज मुळे सेक्स दरम्यान जेव्हा फ्रिकशन होते तेव्हा पोटाच्या खालील बाजूस दुखणे आणि जळजळ होत असल्याचा अनुभव येतो. जर तुमच्या पार्टनरला ईस्ट इंफेक्शन किंवा युटीआयची समस्या असेल तर सेक्स खुप पेनफुल होऊ शकते.

-वजाइनल ड्राइनेस
जर तुमचा वजाइना नैसर्गिक रुपात लुब्रिकेंट प्रोड्युस करत नसेल तर वजाइनामध्ये ड्राइनेसची समस्या होऊ शकते. यामुळे पेनिट्रेटिव सेक्स दरम्यान दुखण्याचा अनुभव येऊ शकते. सेंटर फॉर डिजीज कंट्रोल अॅन्ड प्रीवेंशनच्यानुसार वजाइनल ड्राइनेसची काही कारणं असू शकतात. खासकरुन हे मेनोपॉज, ब्रेस्टफिडिंग आणि प्रेग्नेंसीमध्ये झालेल्या हार्मोनल बदलावामुळे होऊ शकते.

-एंडोमेट्रियोसिस
एंडोमेट्रियोसिस एक अशी स्थिती आहे ज्यामध्ये एंडोमेट्रियम ऊती गर्भाशयाच्या बाहेर काढल्या जातात. ज्यामुळे ओवरी, ब्लॅडर, सर्विक्स, फॅलोपियन ट्युबच्या आजूबाजूला सूज येते. या स्थितीत पेनिट्रेटिव सेक्स दरम्यान वजाइनच्या आतमध्ये खुप टोचल्यासारखे वाटते.

-टिल्डेड युट्रस
नॅशनल लाइब्रेरी ऑफ मेडिसन नुसार जर तुमचे युट्रस रेट्रोवर्टेड आहे. म्हणजेच पुढच्या बाजूला झुकलेला असण्याऐवजी मागच्या बाजूला झुकलेला असेल तर पेनिट्रेटिव सेक्स दरम्यान खुप दुखू शकते. जेव्हा युट्रस मागच्या बाजूला झुकलेला असतो तेव्हा वजाइनल केनाल सर्विक्सच्या खुप जवळ येते. यामुळे सेक्स दरम्यान सर्विक्स प्रभावित होते. (sex drive painful reasons)

-एलर्जिक रिअॅक्शन
जर तुम्हाला लेटेस्ट कंडोमपासून एलर्जी असेल तर तुमच्या वजाइनामध्ये खाज, जळजळ होणे किंवा दुखण्याचा अनुभव येऊ शकतो. यामुळे तुम्हाला सेक्स दरम्यान दुखण्याचा अनुभव येत असेल तर नेहमीच नॅच्युरल मटेरियल पासून तयार करण्यात आलेल्या कंडोमचा वापर करावा. त्याचसोबत केमिकलयुक्त लुब्रिकेंटचा वापर करण्यापासून दूर रहावे. इंटिमेट एरियाला स्वच्छ करण्यासाठी केमिकलयुक्त साबण आणि अन्य फेमिनिन प्रोडक्ट्सचा वापर करु नये.


हेही वाचा- Oral Sex ओरल सेक्समुळे कॅन्सर होतो का?

- Advertisment -

Manini