घरमनोरंजन'महाभारत' मालिकेतील शकुनी मामा उर्फ गूफी पेंटल यांचे निधन

‘महाभारत’ मालिकेतील शकुनी मामा उर्फ गूफी पेंटल यांचे निधन

Subscribe

ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी यांचे काल (4 जून) रोजी निधन झाले. या दुःखद बातमीने संपूर्ण मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली आहे. दरम्यान, अशातच पुन्हा एकदा मनोरंजनसृष्टीतून आणखी एक दुःखद बातमी समोर येत आहे. हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय ‘महाभारत’ या मालिकेत शकुनी मामा ही भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते गूफी पेंटल यांचे आज निधन झाले आहे.

ज्येष्ठ अभिनेते गूफी पेंटल मागील अनेक दिवसांपासून आजारी असल्याची बातमी समोर येत होती. अनेक दिवसांपासून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. परंतु आज सकाळी वयाच्या 78 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मिळालेल्या माहितीनुसाक, आज दुपारी अंधेरी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

- Advertisement -

या मालिकांमध्ये केले होते काम

गूफी पेंटल यांना ‘महाभारत’ या लोकप्रिय मालिकेसोबतच त्यांनी  ‘अकबर बीरबल’, ‘सीआयडी’ आणि ‘राधा कृष्णा’ यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले होते. मात्र, ‘महाभारत’ या मालिकेत साकारलेल्या शकुनी मामा या भूमिकेमुळे त्यांनी अभिनेता म्हणून ओळख मिळाली. या भूमिकेमुळे ते घरा-घरांत पोहोचले. लोक आजही त्यांना त्या भूमिकेमुळे ओळखतात.

Mahabharat Shakuni Mama Actor Gufi Paintal passed away at the age of 78

- Advertisement -

दरम्यान, अभिनेते गूफी पेंटल यांच्याव्यतिरिक्त मागील काही दिवसांपासून मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकारांनी या जगाची निरोप घेतला आहे. ज्यात ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर, अभिनेते-दिग्दर्शक आमीर हुसैन, अभिनेता आदित्य सिंग राजपूत, वैभवी उपाध्याय आणि नितेश पांडे यांचे निधन झाले आहे.

 


हेही वाचा :

सुलोचना दीदींच्या जाण्याने कलाविश्वावर शोककळा; अमिताभ, धर्मेंद्र झाले भावूक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -