घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रउमेदवारांना द्यावी लागणार गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती

उमेदवारांना द्यावी लागणार गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती

Subscribe

वृत्तपत्र, टी.व्ही.वर तीन वेळा जाहिरात अनिवार्य

नाशिक रिंगणात उतरलेल्या उमेदवारांना गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती जाहीर करणे निवडणूक आयोगाने अनिवार्य केले आहे. त्यासंदर्भात आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार उमेदवारांना प्रचारकाळात किमान तीन वेळा वृत्तपत्र आणि टीव्ही चॅनल्सच्या माध्यमातून संबंधित माहितीच्या जाहिराती प्रसिद्ध कराव्या लागतील. याशिवाय, राजकीय पक्षांनाही त्यांच्या उमेदवारांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीविषयीची माहिती त्यांच्या संकेतस्थळावरून द्यावी लागणार आहे.

उमेदवारांनी त्यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीबाबतची माहिती प्रसारमाध्यमांमधून जाहीर करावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी दिला होता. उमेदवाराबाबत मतदारांना निर्णय घेता यावा या उद्देशातून तो आदेश देण्यात आला. त्याला अनुसरून निवडणूक आयोगाने पाऊल उचलले आहे. आयोगाच्या आदेशामुळे उमेदवारांना दोषी ठरलेल्या प्रकरणांची आणि प्रलंबित प्रकरणांची माहिती त्यांच्या पक्षांना द्यावी लागणार आहे. प्रथम प्रसिद्धी उमेदवारी अर्ज माघारीच्या तारखेपासून पहिल्या चार दिवसातच करावी. दुसरी प्रसिद्धी यापुढील पाच ते आठ दिवसात करावी आणि तिसरी प्रसिद्धी 9 व्या
दिवसापासून प्रचाराच्या शेवटच्या दिवसापर्यंत करावी. वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या जाहिरातींची कात्रणे उमेदवारांना सादर करावी लागतील. पक्षांना गुन्हेगारी पार्श्वभूमी असणार्‍या उमेदवारांची संख्या नमूद करावी लागेल. गुन्हेगारी पार्श्वभूमी नसणार्‍या उमेदवारांना त्याविषयीचा उल्लेख करावा लागेल. या जाहिरातीचा खर्च हा उमेदवारांच्या निवडणूक खर्चात समाविष्ट करण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -