घरलाईफस्टाईलHome Cleaning : घर स्वच्छ करण्यासाठी उपयुक्त ठरणारे तुरटीचे हॅक्स

Home Cleaning : घर स्वच्छ करण्यासाठी उपयुक्त ठरणारे तुरटीचे हॅक्स

Subscribe

घर स्वच्छ करण्यासाठी घरातील गृहिणी हरतऱ्हेचे प्रयन्त करते. यासाठी बाजारात मिळणारे अनेक प्रोडक्ट्स घरी आणून त्याचा वापर घर स्वच्छ करण्यासाठी केला जातो. पण, आज आम्ही तुम्हाला घरी असणाऱ्या अशा एका गोष्टीचे हॅक्स सांगणार आहोत ज्याच्या साहाय्याने तुम्ही घर स्वच्छ करू शकाल ते म्हणजे तुरटी. अनेकदा घरातील पुरुष मंडळी दाढी केल्यानंतर आणि आधी चेहऱ्यावर तुरटी फिरवतात. हीच तुरटी तुम्ही घराच्या स्वच्छतेसाठीही वापरू शकता. बाथरूम आणि किचनमध्ये असणाऱ्या तुरटीचे हॅक्स आज आपण पाहणार आहोत.

तुरटीचे हॅक्स

पाणी स्वच्छ करण्यासाठी –

घर आकर्षक करण्यासाठी घरात फिश टॅंक, शो-पीस आणले जातात. मात्र, जेव्हा या वस्तू स्वच्छ करण्याची वेळ येते तेव्हा अनेकांच्या कपाळावर आठ्या दिसून येतात. अशावेळी तुम्हाला तुरटीची मदत होऊ शकते. कारण फिशटॅन्कमध्ये पाणी अनेक दिवस असल्याने पाण्याला दुर्गंधी येते. अशावेळी तुम्ही पाण्याची टाकी स्वच्छ करण्यासाठी तुरटी वापरायला हवी. तसेच पाण्याची टाकी सर्वांचाच घरत असते ती स्वच्छ करण्यासाठी तुम्हाला तुरटी वापरता येईल.

- Advertisement -

टाईल्स –

तुरटीच्या साहाय्याने टाईल्स आणि लादी स्वच्छ करता येते. तुरटीच्या साहाय्याने जमिनीवरील घाण सहज निघून जाते. यासाठी एका बादलीत गरम पाणी घ्या. यात तुरटीचे तुकडे करून 20 मिनिटे ठेवा. जेव्हा तुरटी पाण्यात पूर्णपणे विरघळेल तेव्हा त्या पाण्याने लादी स्वच्छ करा. तर टाइल्सवरचा पिवळेपणा दूर करण्यासाठी तुरटीचे पाणी डाग लागलेल्या भागावर टाकून ब्रशच्या सहाय्याने काही वेळ घासा. असे केल्याने टाइल्सवर जमा झालेला पिवळसरपणा निघून जाईल.

- Advertisement -

फ्रेशनर –

तुरटीचा वापर तुम्ही घरात फ्रेशनर म्हणूनही करू शकता. तुम्ही जागोजागी तुरटीची तुकडे ठेऊ शकता किंवा ज्या ठिकाणहून दुर्गंधी येत असेल त्या जागी तुरटी फिरवा.

कीटक घालविण्यासाठी –

घराच्या आजूबाजूस जर अस्वच्छ परिसर असेल तर कीटकांचा त्रास सहन करावा लागतो. प्रामुख्याने ही समस्या पावसाळ्यात प्रकर्षांने जाणवते. अशावेळी एक साधासोप्पा घरगुती उपाय तुम्ही करू शकता. यासाठी एक पावडर तयार करा. पावडर तयार करण्यासाठी तुरटी, कापूर आणि फिनाइलच्या गोळ्या घ्या. तिन्ही वस्तूंची पावडर तयार झाल्यावर बाटलीत भरा. वेळेनुसार फवारणी करण्यासाठी त्याचा वापर करा. लिक्विडच्या तीव्र वासामुळे कीटक निघून जातील.

 

 

 

 


हेही पहा : घर असं ठेवा डस्ट फ्री

Edited By – Chaitali Shinde

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -