घरताज्या घडामोडीX Update : इलॉन मस्कचा युझर्सना मोठा धक्का; X वर पोस्ट, लाईक,...

X Update : इलॉन मस्कचा युझर्सना मोठा धक्का; X वर पोस्ट, लाईक, रिप्लायसाठी मोजवे लागणार पैसे

Subscribe

जेव्हापासून मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) ताब्यात घेतले, तेव्हापासून इलॉन मस्क याने आतापर्यंत मोठे निर्णय घेतले आहेत. अशात आणखी एक मोठा निर्णय इलॉन मस्कने घेतला आहे.

मुंबई : जेव्हापासून मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) ताब्यात घेतले, तेव्हापासून इलॉन मस्क याने आतापर्यंत मोठे निर्णय घेतले आहेत. अशात आणखी एक मोठा निर्णय इलॉन मस्कने घेतला आहे. त्यानुसार, आता एक्सवरील एखादी पोस्ट लाईक करणे, त्या पोस्टवर रिप्लाय देणे एवढेच नाही तर बुकमार्क करण्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. त्यामुळे आता X वापरणाऱ्या युझर्सचा खिशाला कात्री लागणार आहे. (Elon Musk Says New X Users Will Need To Pay For Posting On Platform)

मिळालेल्या माहितीनुसार, इलॉन मस्क याने बॉट्सच्या कारणामुळे येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. मस्क याने X वरून युझर्सना याबाबत माहिती दिली. एलॉन मस्कने दिलेल्या माहितीनुसार, हा नियम या प्लॅटफॉर्मवरील सर्वच युझर्सला लागू असेल. नवीन युझर्सला पण पैसे मोजावे लागणार आहेत. नवीन खाते तयार करणारे युझर्स तीन महिन्यानंतर कोणतेही शुल्क न भरता युझर्स पोस्ट करु शकतील. गेल्यावर्षी मस्कने फिलिपीन्स आणि न्युझीलंडमधील नवीन युझर्ससाठी वार्षिक 1 डॉलर शुल्क आकारणी सुरु केलेली आहे.

- Advertisement -

X च्या नवीन धोरणानुसार X वर पोस्ट करणे, एखाद्याच्या पोस्ट लाइक करणे, पोस्ट बुकमार्क करणे आणि पोस्टला उत्तर देणे यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागतील. तुम्ही फक्त एक खाते मोफत फॉलो करू शकाल. प्लॅटफॉर्मवर स्पॅम रोखण्यासाठी या धोरणाची दीर्घकाळ चाचणी केली जात आहे.

दरम्यान, एलॉन मस्क यांने नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मायक्रोब्लॉगिंक प्लॅटफॉर्म एक्सवरील अनेक बोगस, डप्लिकेट आणि फसवी अकाऊंट्स बंद केली आहे. या वर्षी 26 फेब्रुवारी ते 25 मार्च या दरम्यान जवळपास 2 लाख 13 हजार X अकाऊंट्स बंद करण्यात आली आहे. प्रौढ कंटेंटसाठी एक्सवरील युझर्स कम्युनिटी तयार करु शकतील. त्यांना सेटिंगमध्ये याविषयीची माहिती लवकरच उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. याविषयीचा स्क्रीनशॉट ॲनालिस्ट Daniel Buchuk यांनी शेअर केला आहे.

- Advertisement -

एलॉन मस्कने प्रत्येक सुविधेसाठी शुल्क लावल्याचे पाहायला मिळत आहे, म्हणजेच एलॉन मस्क X (पूर्वीचे ट्विटर) चे मालक झाला. तेव्हापासून त्यांने संपूर्ण लक्ष एक्समधून पैसे कमवण्यावर केंद्रित केले आहे. सुरुवातील इलॉन मस्कने एक्सच्या सशुल्क सेवा सुरू केल्या आणि ब्लू टिक शुल्क आधारित केले. ब्लू टिक याआधी मोफत उपलब्ध होती आणि त्यासाठी काही अटी होत्या.


हेही वाचा – Heavy Rain In Dubai : दुबईची झाली तुंबई! मुसळधार पावसामुळे दुबईतील एअरपोर्ट, मॉल पाण्याखाली

Edited By – Vaibhav Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -