घरलाईफस्टाईलकारमधील AC मुळे माइलेजवर होतो परिणाम?

कारमधील AC मुळे माइलेजवर होतो परिणाम?

Subscribe

वाढत्या गरमीमुळे एसीचा वापर ही फार वाढला जातो, खासकरुन प्रवासादरम्यान. परंतु कारच्या एसीच्या वापराबद्दल लोकांच्या मनात विविध प्रश्न उपस्थितीत राहतात. बहुतांश लोक कारमधील एसीच्या फॅनचा स्पीड वाढवण्यास घाबरतात. कारण त्यांना वाटते की, असे केल्यास याचा परिणाम त्यांच्या माइलेजवर होऊ शकतो. पण खरंच एसीच्या फॅनचा स्पीड वाढवल्यास माइलेज कमी होतो का? याच बद्दल अधिक जाणून घेऊयात. (Car Ac fan speed)

सर्वात प्रथम हे जाणून घेतले पाहिजे की, कारमधील एसीचे मॅकेनिज्म पूर्णपणे इंजिनला कनेक्टेड असते. यामुळेच एसीचा वापर कारच्या माइलेजवर होतो. जेव्हा एसी सुरु केली जाते तेव्हा याचा अतिरिक्त बोझा इंजिनवर पडतो. खरंतर असे एसीच्या कंप्रेसरमुळे होते. जो इंजिन द्वारे बेल्टच्या माध्यमातून चालवले जाते. कंप्रेसरला चालवण्यासाठी एनर्जी हवी असते जी त्याला थेट इंजिनमधून मिळते.

- Advertisement -

परंतु एसीचा फॅन कारच्या बॅटरी म्हणजेच इलेक्ट्रिकल कंपोनेंटला कनेक्टेड असते. जे केवळ हवेला केबिनच्या आतमध्ये प्रसारित करण्याचे काम करते. एसीच्या फॅनला बॅटरीमुळे उर्जा मिळते. यामुळे ते कमी जास्त करण्यासाठी कारच्या माइलेजवर कोणताही परिणाम होत नाही. म्हणजेच जर तुम्ही 1 वर सुरु ठेवलात किंवा 4 वर तेलाची खपत ही समान होते.

- Advertisement -

हेही वाचा- घरकाम करणाऱ्या बाईला पैसे देण्याऐवजी घरी आणा हे Vacuum Cleaner

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -